आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा, एकास अटक
By अण्णा नवथर | Updated: April 27, 2023 17:16 IST2023-04-27T17:16:22+5:302023-04-27T17:16:58+5:30
साजिद उस्मान पठाण ( ३२, वडाळा बहिरोबा, ता. नेवासा ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा, एकास अटक
अहमदनगर: आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा खेळत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकास माळीचिंचोरा फाटा (ता. नेवासा) येथून अटक केली. साजिद उस्मान पठाण ( ३२, वडाळा बहिरोबा, ता. नेवासा ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथे उघड्यावर बसून एक इसम आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा खेळत आहे, अशी माहिती गुप्त बातमीदारामाफत पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने माळीचिंचोरा फाटा येथे सापळा लावला असता आरोपी साजिद पठाण हा मोबाईलवरून आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेत असल्याचे आढळून आले. त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीस नेवासा पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.