बेलवंडी पोलिसांनी केला पंधरा लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:21 IST2021-05-19T04:21:40+5:302021-05-19T04:21:40+5:30

बेलवंडी पोलीस ठाण्याअंतर्गत ४८ गावे येतात. नगर-पुणे महामार्गावरील गव्हाणवाडी येथे तपासणी नाक्यावर कर्मचारी कार्यरत असतात. कर्मचारी कमी असतानाही बेलवंडी ...

Belwandi police recovered a fine of Rs 15 lakh | बेलवंडी पोलिसांनी केला पंधरा लाखांचा दंड वसूल

बेलवंडी पोलिसांनी केला पंधरा लाखांचा दंड वसूल

बेलवंडी पोलीस ठाण्याअंतर्गत ४८ गावे येतात. नगर-पुणे महामार्गावरील गव्हाणवाडी येथे तपासणी नाक्यावर कर्मचारी कार्यरत असतात. कर्मचारी कमी असतानाही बेलवंडी पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई सुरू आहे. पुण्याकडून येणाऱ्या गाड्यांची तपासणी करताना त्यांच्याकडे ई-पासेस आहेत का? मास्क लावले आहे? का? विनाकारण कोण फिरत आहे? याची खातरजमा केली जात आहे. नसेल तर दंडात्मक कारवाई केली जात आहे. विनामास्क विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांकडूनही दंड वसूल केला जात आहे.

१ फेब्रुवारी ते १७ मेपर्यंत पोलिसांनी १५ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. बेलवंडी पोलीस स्टेशनचे निरीक्षक संपतराव शिंदे, उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, हेड कॉन्स्टेबल हसन शेख, संतोष गोमसाळे, ज्ञानेश्वर पठारे, एम. के. कोळपे, रावसाहेब शिंदे, बजरंग गवळी, संदीप दिवटे, नामदेव शेलार, एम. एल. सुरवसे, संपत गुंड, विकास कारखिले, एस. वाय. जरे, महिला पोलीस नाईक शोभा काळे आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

--------------

वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत कर्मचारी कमी असतानाही आहे त्या कर्मचऱ्यांच्या सहकार्याने कारवाई सुरू आहे. नागरिकांनी स्वतःबरोबर इतरांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे.

- संपतराव शिंदे, पोलीस निरीक्षक, बेलवंडी पोलीस ठाणे

------

फोटो ओळी- १८बेलवंडी पोलीस

नगर-पुणे महामार्गावर गव्हाणवाडी चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करताना बेलवंडी पोलीस.

Web Title: Belwandi police recovered a fine of Rs 15 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.