भाजपाचे उत्तरेत संघटनात्मक बांधणीचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:20 IST2021-08-01T04:20:08+5:302021-08-01T04:20:08+5:30
विविध आघाडी व सेल प्रभारी जिल्हाध्यक्षांच्या निवडी पुढील प्रमाणे करण्यात आल्या आहेत. सहकार आघाडी व वैद्यकीय आघाडी अध्यक्षपदी रवींद्र ...

भाजपाचे उत्तरेत संघटनात्मक बांधणीचा श्रीगणेशा
विविध आघाडी व सेल प्रभारी जिल्हाध्यक्षांच्या निवडी पुढील प्रमाणे करण्यात आल्या आहेत. सहकार आघाडी व वैद्यकीय आघाडी अध्यक्षपदी रवींद्र बोरावके, उद्योग आघाडीच्या अध्यक्षपदी सचिन देसरडा, अल्पसंख्यांक आघाडीच्या अध्यक्षपदी नितीन कापसे, किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी जालिंदर वाकचौरे, भटके विमुक्त आघाडीच्या अध्यक्षपदी सुनील वाणी, महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, ओबीसी मोर्चा व दक्षिण भारतीय आघाडीच्या अध्यक्षपदी अशोक पवार, अनुसूचित जाती मोर्चा व अनुसूचित जमाती मोर्चाच्या अध्यक्षपदी विनोद राक्षे, कामगार आघाडीच्या अध्यक्षपदी सतीश सौदागर, व्यापार आघाडीच्या अध्यक्षपदी गणेश राठी, युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नितीन दिनकर, वाहतूक आघाडीच्या अध्यक्षपदी गिरजाजी जाधव, शिक्षक आघाडीच्या अध्यक्षपदी सुधाकर गुंजाळ, सोशल मीडिया सेल व उत्तर भारतीय आघाडी सेलच्या अध्यक्षपदी कैलास खैरे, दिव्यांग आघाडीच्या अध्यक्षपदी किरण दगडे, माजी सैनिक सेलच्या अध्यक्षपदी दिलीप नगरे, आध्यात्मिक आघाडी व नमामी गंगेच्या अध्यक्षपदी रघुनाथ बोठे, मच्छीमार सेलच्या अध्यक्षपदी राजेंद्र सांगळे, सांस्कृतिक सेलच्या अध्यक्षपदी अंकुश काळे, ज्येष्ठ नागरिक सेलच्या अध्यक्षपदी अनिल भनगडे यांनी निवड करण्यात आल्या.