बोधेगावातील खड्डे बुजविण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:20 IST2021-08-01T04:20:36+5:302021-08-01T04:20:36+5:30
शेवगाव : तालुक्यातील बोधेगाव येथे डॉ. क्षितिज घुले युवा मंचच्या वतीने खड्ड्यात वृक्षारोपण करत गांधीगिरी करण्यात आली होती. दरम्यान, ...

बोधेगावातील खड्डे बुजविण्यास सुरुवात
शेवगाव : तालुक्यातील बोधेगाव येथे डॉ. क्षितिज घुले युवा मंचच्या वतीने खड्ड्यात वृक्षारोपण करत गांधीगिरी करण्यात आली होती. दरम्यान, त्यांच्या आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या खड्ड्यांत खडी आणि मुरूम टाकत रस्त्याची दुरुस्ती केली आहे.
बोधेगाव बसथांब्यासमोरील रस्त्यावर मोठाले खड्डे पडल्याने पादचारी व वाहनधारकांना या ठिकाणाहून जाताना जीव मुठीत धरून चालावे लागत होते. या रस्त्याची झालेली अवस्था लक्षात घेऊन डॉ. क्षितिज घुले युवा मंचचे कार्यकर्ते अनिल घोरतळे, सचिन घोरतळे, सिद्धांत घोरतळे, प्रसाद पवार, मनोज घोरतळे, तुषार जायगुडे, चेतन देशमुख, ज्ञानेश्वर घोरतळे, हारुण बागवान आदींनी खड्ड्यांत वृक्षारोपण करत गांधीगिरी केली होती. येत्या आठ दिवसांत खड्डे न बुजविल्यास रास्ता रोकोचा इशाराही दिला होता. आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अंकुश पालवे तसेच उमेश केकाण यांनी संबंधितांना तत्काळ रस्ता दुरुस्तीचे आदेश दिल्याने खड्डे बुजविण्यात आले.
---
३१ बोधेगाव रोड
बोधेगाव येथील रस्त्यावरील खड्डे बुजविताना कर्मचारी.