श्रीरामपुरातून गोमांस जप्त, एकाला अटक; साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

By शिवाजी पवार | Updated: May 23, 2023 14:00 IST2023-05-23T14:00:17+5:302023-05-23T14:00:21+5:30

कारवाईत ६३ हजार रुपये किमतीचे गोमास तसेच चार लाख रुपये किमतीची एक पीकअप (एमएच २३ वाय ६०९९) जप्त करण्यात आली.

Beef seized from Srirampur, one arrested; Four and a half lakh worth of goods seized | श्रीरामपुरातून गोमांस जप्त, एकाला अटक; साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपुरातून गोमांस जप्त, एकाला अटक; साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर : शहरातील धनगर वस्ती परिसरातून पोलिसांनी साडेचार लाख रुपये किमतीचे गोमास व मुद्देमाल हस्तगत केला.  या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपीचे नाव मुजाहिद मुस्ताक कुरेशी (वय २३, रा कुरेशी जमातखाना श्रीरामपूर) असे आहे ). धनगर वस्ती परिसरामध्ये एका वाहनातून गोमास विक्रीसाठी चालल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सोमवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली.

कारवाईत ६३ हजार रुपये किमतीचे गोमास तसेच चार लाख रुपये किमतीची एक पीकअप (एमएच २३ वाय ६०९९) जप्त करण्यात आली. आरोपी कुरेशी हा या गोमासाची विक्री करत होता. त्यामुळे पोलिस या प्रकरणातील अन्य आरोपींचा तपास करत आहेत. आरोपी कुरेशीविरुद्ध प्राणी रक्षण अधिनियम १९९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Beef seized from Srirampur, one arrested; Four and a half lakh worth of goods seized