श्रीगोंद्यातील कोविड सेंटरला बेडशीट भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:10 IST2021-05-04T04:10:01+5:302021-05-04T04:10:01+5:30
ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील बोरी गावातील जयेश थोरात यांची कन्या प्रियांशी हिच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या खर्चाला फाटा ...

श्रीगोंद्यातील कोविड सेंटरला बेडशीट भेट
ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील बोरी गावातील जयेश थोरात यांची कन्या प्रियांशी हिच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या खर्चाला फाटा देत श्रीगोंदा शहरातील डॉ. आंबेडकर वसतिगृह व श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथील कोविड सेंटरला शंभर बेडशीट भेट देण्यात आले. या उपक्रमात राजापूर येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनीही सहभाग घेतला. गरज भासल्यास लोकवर्गणीतून कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संतोष शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार प्रदीप पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर, आरपीआयचे माजी तालुकाध्यक्ष जिवाजी घोडके, तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप, राजू उबाळे, माजी उपसरपंच जयेश थोरात, लोकशिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद काळे, अव्वल कारकून जनार्दन सदाफुले, लिपिक पी. एम. ओगले, आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेचे तालुका उपाध्यक्ष विजय भोसले आदी उपस्थित होते.---
०३ राजापूर