शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र एकसंध ठेवण्याची लढाई

By admin | Updated: October 8, 2014 00:24 IST

अहमदनगर : राज्यावर अफजलखानाचे संकट आले आहे. त्यामुळे विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्र एकसंध ठेवण्याची लढाई आहे. निष्ठावंतांची सेना फक्त शिवसेनेकडेच आहे.

अहमदनगर : राज्यावर अफजलखानाचे संकट आले आहे. त्यामुळे विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्र एकसंध ठेवण्याची लढाई आहे. निष्ठावंतांची सेना फक्त शिवसेनेकडेच आहे. मुख्यमंत्रिपदासारखा उमेदवार कोणाकडेही नाही. काँग्रेसकडे बिनकामाचा बाबा, तर राष्ट्रवादीकडे धरणं भरणारा दादा आहे. आता तुमचा मुख्यमंत्री कोण? असा सवाल करीत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासह दोन्ही काँग्रेसवर निशाणा साधला.अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या उमेद्वारांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची गांधी मैदानात सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, युती तोडायची शिवसेनेची अजिबात इच्छा नव्हती. पहिल्या तीन पिढ्यांनी युती जपली. मात्र भाजपाच्या नव्या पिढीने युती तोडली. त्यांनी आमच्याशी असलेली युती तोडली नाही, तर ती भगव्याशी, हिंदुत्त्वाशी असलेली युती तोडली आहे. त्यांचे कमळ आता भगवे राहिले नसून पांढरे झाले आहे. लोकसभेत त्यांचे खासदार निवडून आले ते शिवसेनेमुळेच. त्यावेळी आमचा उपयोग करून घेतला. आता शिवछत्रपतींचा आशीर्वाद मागत आहेत. ‘महाराष्ट्र माझा’ हा दीन-दलितांचा, गोर-गरिबांचा महाराष्ट्र आहे. भाजपाने कधी शिवजयंती साजरी केली का? आता कोठून त्यांना शिवछत्रपती आठवले? आजपर्यंत कोणत्याही गडावर न गेलेले भाजपावाले आता मतांसाठी नवे गड शोधून काढतील. जो महाराष्ट्राची सेवा करतो, त्यालाच छत्रपतींचे आशीर्वाद मिळतील, असे सांगत ठाकरे यांनी भाजपाचे शिवछत्रपती प्रेम बेगडी असल्याचे स्पष्ट केले.२५ वर्षांनंतर आम्ही एकटे लढतो असलो तरी आम्ही एकटे नाही, तर जनता आमच्या पाठीशी आहे. पश्चिम महाराष्ट्रात धनगर, महादेव कोळी समाजाचे लोक येऊन भेटले. आमचे नेते कुठेही जाऊ द्या,समाज म्हणून आम्ही शिवसेनेच्या पाठीशी असल्याचे वचन त्यांनी दिले आहे. जैन, राजस्थानी, गुजराथी समाज सेनेसोबत आहे. व्यापारी टॅक्स भरायला तयार आहे. मात्र सरकारने वसुलीची पद्धत क्लिष्ट करून टाकली. व्यापाऱ्यांचा फक्त छळच सुरू आहे. व्यापारी काही गुन्हेगार नाहीत. सेनेचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा एलबीटी रद्द केला जाईल,असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. व्हीजन डॉक्युमेंटची माहिती देऊन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा समावेश असलेला टॅब्लेट देण्याची घोषणाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)