धरणांनी गाठला तळ

By Admin | Updated: March 27, 2016 23:41 IST2016-03-27T23:36:49+5:302016-03-27T23:41:16+5:30

अहमदनगर : धरणांतील पाण्याची घटलेली पातळी जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे़ प्रमुख मुळा व भंडारदरा धरणांत अवघा साडेचार टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे़

The base reached by the dams | धरणांनी गाठला तळ

धरणांनी गाठला तळ

अहमदनगर : धरणांतील पाण्याची घटलेली पातळी जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे़ प्रमुख मुळा व भंडारदरा धरणांत अवघा साडेचार टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे़ हा पाणीसाठा पुढील चार महिने पुरेल़ मात्र, जुलैपर्यंत वरुणराजाची कृपा न झाल्यास काय, याची चिंता सध्या सर्वांना लागून आहे़
उन्हाचा पारा एकदम वाढला आहे़ सर्वांच्या घशाला कोरड पडली आहे़ पिण्याच्या पाण्याची मागणी मार्च अखेरीस अचानक वाढली़ बहुतांश गावांतील पाण्याचे उद्भव कोरडे पडले आहेत़ त्यामुळे सर्वांची भिस्त जिल्ह्यातील धरणांवर आहे़ मात्र, जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या भंडारदरा व मुळा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडले गेले़ त्यामुळे या दोन्ही धरणांतील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली़मुळात सध्या ७ हजार ७८५ तर भंडारदरा धरणात अवघा १ हजार ८५९ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे़ उन्हामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे़ उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आले़ दोन्ही धरणांतून पिण्यासाठी प्रत्येकी चार आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला आहे़ गावतळे भरून तेथून टँकरने पाणी पुरविले जाणार आहे़ परंतु वाहतुकीचे अंतर वाढणार असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होण्याची शक्यता आहे़ गावांसह वाड्यावस्त्यांवरही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे पुढील दोन महिन्यांत टँकरची संख्या वाढणार आहे़ दक्षिण नगर जिल्हा पिण्याच्या पाण्यासाठी पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पावर अवलंबून आहे़ कुकडी प्रकल्पातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला आहे़ त्यामुळे दक्षिण नगर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटेल़ उत्तर नगर जिल्ह्यातील राहाता, कोपरगाव आणि श्रीरामपुरासाठी नाशिक जिल्ह्यातील दारणा धारणातून आवर्तन सोडण्यावर एकमत झाले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The base reached by the dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.