शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

इंदिरा गांधींना साथ देणारा बॅरिस्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 14:10 IST

इंदिरा गांधी यांनी १९७५ साली देशात आणीबाणी लावली़ त्यांच्याविरोधात जनक्षोभ उसळला़ अनेक काँगे्रसी निष्ठावंत म्हणवणारे नेतेही इंदिरा गांधींना सोडून गेले़ काँगे्रसची वाताहत झाली़ आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत काँगे्रसला मोठा पराभव सहन करावा लागला़ तत्कालीन जनता पक्षाच्या सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयात आणीबाणीप्रकरणी इंदिरा गांधी यांच्यावर खटला दाखल केला़ त्यावेळी बॅरिस्टर रामराव आदिक यांनी गांधी यांचे वकीलपत्र घेतले आणि त्यांना निर्दोष सोडविलेही़ 

अहमदनगर : कॉग्रेससमोर सध्या कठीण काळ आहे. १९७८ ते १९८० सालातही असाच कठीण काळ होता़ पण तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बॅरिस्टर रामराव आदिक यांनी काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवून दिली होती, ते अहमदनगरचे होते.  काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात आदिक यांच्याविषयी काढलेले हे उद्गार दिवंगत बॅरिस्टर रामराव आदिक यांचे काँगे्रसमधील त्यावेळचे महत्व आणि कार्य अधोरेखित करते़ खानापूर (ता. श्रीरामपूर) या खेडेगावात २४ डिसेंबर १९२८ रोजी रामराव यांचा जन्म झाला़ त्यांचे प्राथमिक शिक्षण उंदिरगावला (आजोळ) झाले. खानापूरपासून ते पाच किलोमीटर शाळेत पायी जात. वेळप्रसंगी आजोळी थांबत. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले. चार भावंडांचे हे कुटुंब. रामराव हे त्यात थोरले. लक्ष्मणराव, केशवराव, गोविंदराव व बहीण शांताबाई ही भावंडे. वडिलांच्या निधनामुळे रामराव यांच्यावरच वडिलकीची जबाबदारी आली़रामराव यांचे चुलते जे रंजकराव मास्तर म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते, त्यांनीच रामराव यांना शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले. त्यांनी  रामराव यांना चौथीनंतर पुणतांबे येथे शिक्षणाला पाठविले. त्यावेळच्या सातवीच्या परीक्षेत ते जिल्ह्यात पहिले आले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी नगरला जाण्याचा निर्णय घेतला. मॅट्रीक परीक्षेच्या निकालाच्या दिवशी बेलापूर साखर कारखान्यात येणाºया टाईम्स आॅफ इंडियात आपण पास झालो का हे पाहण्यासाठी त्यांनी पेपर चाळला. फर्स्ट क्लासच्या यादीत त्यांचे नाव होते. पुढे नगरलाच कॉलेजात ते दाखल झाले. सकाळी कॉलेज आणि दुपारी त्यावेळच्या पोलीस खात्यात नोकरी, अशा कठीण स्थितीत त्यांनी शिक्षण सुरू ठेवले.त्यावेळचे खानापूर हे गोदावरी नदीकाठचे गाव आजच्यासारखे विकसित नव्हते. शिक्षण घेणे म्हणजे रिकामटेकड्यांचे उद्योग अशी त्यावेळची धारणा़ मुलांनी शेतीत कामाला यावे, अशीच लोकांची धारणा. अशा परिस्थितीत रामराव आदिकांनी नगरमध्ये काम आणि शिक्षण अशी दुहेरी कसरत केली़ पुढे त्यांनी पुण्याला लॉ कॉलेजला प्रवेश मिळविला. एक वर्ष तिथे लॉ केल्यानंतर मुंबई गाठली. मुंबईतच त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. १९५० मध्ये रामराव विवाहबद्ध झाले. त्यावेळी मुंबईतील माधवराव कडणे (मूळचे संगमनेर तालुक्यातील चंदनापुरीचे) हे उद्योजक होते. त्यांना भगिरथी या एकमेव कन्या होत्या. माधवराव हे एका उच्च शिक्षित वराच्या शोधात होते. त्यांना रामराव यांच्याबद्दल माहिती मिळाली. त्यावेळी रामराव यांनी नुकतीच मुंबई हायकोर्टात वकिली सुरू केली होती. आपल्या गावाकडचा एक तरुण प्रॅक्टिस करतो आहे, हे समजल्यावर माधवरावांनी गावाकडची थोडी माहिती घेतली. त्यावेळच्या बेलापूर कंपनीच्या (साखर कारखाना) शेतकी विभागात कार्यरत असलेले गोडगे हे माधवरावांचे साडू होते. त्यांच्याकरवीच रामराव यांचे नातेसंबंध पाहून सोयरीक जुळली.रामराव यांना अफाट स्मरणशक्तीची अद्भूत देण लाभली होती. आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर थोड्याच कालावधीत रामरावजींनी हायकोर्टात आपली छाप सोडली. गावाकडून आलेल्या रामराव यांना गरिबीची जाण होती. राज्याच्या कानाकोपºयातून हायकोर्टात येणाºया दीनदुबळ्यांसाठी रामराव यांचा मोठा आधार वाटे. गरीब शेतकरी आणि अनुसूचित किंवा मागासवर्गीयांचे खटले ते विशेष लढायचे. वेळप्रसंगी ते फी घेत नसत. गरिबांचे वकील म्हणून त्यांचा गौरव झाला़ भारताची राज्यघटना म्हणजे या राष्ट्राचा विवेक आहे, असे ते नेहमी म्हणत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांनी भाग घेतला.मुंबई हायकोर्टाच्या बार असोसिएशनचे ते अध्यक्षही झाले. राज्य वकील संघटनेचेही ते काही काळ अध्यक्ष राहिले. १९६३ ते १९६९ मध्ये ते बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. बार कौन्सिल आॅफ इंडियाचेही सदस्य राहिले. परभणी जिल्ह्यातील अकोल्यात भरलेल्या महाराष्ट्र राज्य वकील परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. त्यांची योग्यता पाहून राज्य सरकारने त्यांना महाअधिवक्तापदी नेमले. मुंबई हायकोर्टाच्या ११२ वर्षांच्या इतिहासातील ते पहिले मराठी भाषिक महाअधिवक्ता झाले. सरकारचे मानद कायदा सल्लागार म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी सोपविली गेली. राज्याच्या लॉ कमिशनचे ते अध्यक्ष राहिले. गरिबांसाठीच्या कायदा सेवा बोर्डाचे उपाध्यक्ष होते. मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदासाठी त्यांना निमंत्रित केले गेले. पण त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. रामराव यांचे राजकीय कार्य विद्यार्थी दशेपासूनच सुरू झाले होते. काँग्रेसबरोबरची त्यांची बांधिलकी प्रामाणिक होती. त्यावेळचे मुंबईतील कामगार संघटनेचे बडे नेते व प्रभावशाली राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणजे बॅरिस्टर रजनी पटेल. रामराव यांनी पटेल यांना प्रभावित केले होते. पटेल यांच्यासोबतच त्यांनी काँग्रेसमध्ये काम करण्यास सुरुवात केली. मुंबई प्रदेश काँग्रेसचे ते उपाध्यक्ष झाले. प्रचार समितीचेही ते अध्यक्ष राहिले.मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी रामराव आदिकांनी १ आॅगस्ट १९६५ मध्ये लालबाग परळ भागात महाराष्ट्र हितवर्धिनी ही संस्था स्थापन केली. नोकºया तसेच सरकारी वसाहतीमध्ये मराठी माणसाला ८० टक्के जागा मिळाल्या पाहिजे, परप्रांतीयांचे वर्चस्व वाढू नये अशा संस्थेच्या प्रमुख मागण्या होत्या. दत्ता नलावडे हेदेखील रामराव यांच्यासोबत होते. बाळासाहेब ठाकरेंशीही त्यांची दोस्ती झाली. मराठी माणसाची लढाऊ संघटना म्हणून शिवसेना त्यावेळी उदयास येत होती. शिवसेनेच्या स्थापनेत रामराव तसेच प्र. के. अत्रे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होते. मात्र, तात्विक मतभेदावरून रामराव शिवसेनेपासून दूर गेले़ अत्रेंनीही तेच केले. पुढे आमदार कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर देसाई यांचे वकीलपत्रही रामराव यांनीच घेतले. त्यावेळी कोणत्याही वकिलाने असे धाडस दाखविले नव्हते, ही बाब येथे लक्षात घ्यावी लागेल.मुंबईतील लालबाग या साधारण वस्तीतच रामराव यांनी राहणे पसंत केले. गरिबांप्रतीची त्यांची आत्मियता यातून प्रतित होते. येथे त्यावेळी गुंडांचा धुमाकूळ चालला होता. अशावेळी गुंडविरोधी आघाडी स्थापन करण्याचे धाडसही केवळ रामराव यांनीच दाखविले. मुंबई भाडेकरू संघटनेचेही ते संस्थापक होते. खेदाची बाब म्हणजे कुठल्याही निवडणुकीत रामराव यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली नाही. १९७४ आणि १९८० मध्ये मुंबईतून लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना रोझा देशपांडे आणि राम जेठमलानी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. १९७५ मध्ये आणीबाणी जाहीर झाल्यानंतर देशभरात जनक्षोभ उसळला होता. त्यावेळी अनेकांनी इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्षाची साथ सोडली. काँग्रेसची वाताहत झाली. १९७८ च्या निवडणुकांमध्ये काँगे्रसला सपाटून मार खावा लागला़ जनता पक्षाच्या सरकारने इंदिरा गांधींविरूद्ध अलाहाबाद उच्च न्यायालयात खटला दाखल करून त्यांना तिहार तुरुंगामध्ये पाठवण्याची व्यवस्था केली, तेव्हा एकमेव रामराव आदिक कायदेतज्ज्ञ म्हणून त्यांच्यासोबत होते. जनतेने १९८० मध्ये पुन्हा एकदा इंदिरा गांधींवर विश्वास दाखवत काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले. राज्यातही सत्तांतर झाले. काँग्रेस पक्ष सत्तेत आला. बॅरिस्टर अंतुले यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात रामराव यांचा सन्मानाने समावेश झाला. त्यानंतर तब्बल १९९५ पर्यंत ते सातत्याने राज्य सरकारमध्ये मंत्री राहिले. वसंतदादा पाटील, बॅरिस्टर अंतुले, शरद पवार, बाबासाहेब भोसले, सुधाकरराव नाईक या सर्वांच्या मंत्रिमंडळात त्यांना मानाचे स्थान मिळाले.तालुक्याच्या पातळीवर एमआयडीसी राबविण्याची कल्पना रामराव आदिकांचीच. तालुका पातळीवर शेतकरी व व्यापाºयांच्या मुलांनी लघू व मध्यम उद्योग उभारावेत, अशी त्यांची धारणा होती. एकाच कुटुंबातील एक मुलगा शेती कसेल, तर दुसºयाच्या हातात रोजगार असेल, हा एमआयडीसी स्थापनेमागचा उद्देश. उद्योगमंत्री असताना १९८३ मध्ये त्यांच्या हस्ते श्रीरामपूर येथील एमआयडीसीचे भूमिपूजन झाले. तत्पूर्वी त्याच दिवशी वाळूज (औरंगाबाद) येथील एमआयडीसीचे भूमिपूजन करून ते हेलिकॉप्टरने श्रीरामपूरला आले होते.  राज्याची आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक बैैठक निर्माण करण्यात रामराव आदिक यांचा मोठा वाटा राहिला. सरकारमध्ये त्यांनी पाटबंधारे, अर्थ, उद्योग, विधी व न्याय खाते सांभाळले. रामराव हे सत्यशोधकी विचारांचे होते. राजकीय डावपेचांमध्ये त्यांना कधीही रस नव्हता. राज्याच्या राजकारणात शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्या रुपाने काँग्रेसमध्ये दबावगट कार्यरत होते. मात्र रामराव यापासून नेहमीच लांब राहिले. ते इंदिरा गांधी यांचे एकनिष्ठ राहिले. लेखक - शिवाजी पवार ( उपसंपादक : लोकमत श्रीरामपूर कार्यालय)

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLokmatलोकमत