बाप्पा निघाले गावाला....
By Admin | Updated: September 14, 2016 23:26 IST2016-09-14T23:22:09+5:302016-09-14T23:26:10+5:30
अहमदनगर : दहा दिवसांसाठी पाहुणा म्हणून आलेल्या गणरायांना गुुरुवारी निरोप देण्यात येणार असून, विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे़

बाप्पा निघाले गावाला....
अहमदनगर : दहा दिवसांसाठी पाहुणा म्हणून आलेल्या गणरायांना गुुरुवारी निरोप देण्यात येणार असून, विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे़ नगर शहरासह श्रीरामपूर, संगमनेर, जामखेड व नेवासा संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले असून, येथे पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे़
गणेश विसर्जनासाठी सार्वजनिक मंडळांनीही जोरदार तयारी केली असून, नगर शहरात सकाळी ११ पासून मिरवणुकांना प्रारंभ होणार आहे़ यंदा विसर्जन मिरवणुकीत १५ मंडळे सहभागी होणार आहेत़ यामध्ये विशाल गणपती (माळीवाडा), संगम तरुण मंडळ (वसंत टॉकीज), अदिनाथ तरुण मंडळ (फुलसौंदर चौक), दोस्ती मंडळ (शेरकर गल्ली), जय जवान तरुण मंडळ (फुलसौंदर चौक), महालक्ष्मी तरुण मंडळ (माळीवाडा), कपिलेश्वर तरुण मंडळ (माळीवाडा), नवरत्न तरुण मंडळ (इवळे गल्ली), समझोता तरुण मंडळ (माळीवाडा), निलकमल तरुण मंडळ (माळीवाडा), शिवशंकर मंडळ (पंचपीर चावडी), शिवसेना मंडळ, दोस्ती तरुण मंडळ (बारा तोटी कारंजा) यांचा समावेश आहे़ विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दी व वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहरातील अंतर्गत रस्त्यांवर एकेरी वाहतूक तर काही रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे़ शहरातील रामचंद्र खुंट, पिंजार गल्लीकडे जाणारा रस्ता बेलदार गल्ली, कापड बाजार, शहाजी चौक, भिंगारवाला चौक, बाई इचरचबाई फिरोदिया शाळा, नवी पेठ, नेता सुभाष चौक यासह रंगार गल्ली रोड, चौपाटी कारंजा, नेप्ती नाका, भिस्तबाग चौक आदी ठिकाणी बेरिकेटींग करण्यात आले आहेत़ विसर्जन मिरवणुकीदरम्यान मार्गावरील धार्मिक स्थळे तात्पुरत्या स्वरूपात झाकून टाकण्यात येणार आहेत़
पोलीस बंदोबस्त
अप्पर पोलीस अधीक्षक १, २ पोलीस उपाधीक्षक, १० उपनिरीक्षक, ४५० पोलीस कर्मचारी, ७५ महिला पोलीस, एसआरपीची एक तुकडी, शीघ्र कृतीदल एक तुकडी २०० होमगार्ड तर जिल्ह्यातील इतर तालुक्यांसाठी १ अप्पर पोलीस अधीक्षक, ९ पोलीस उपाधीक्षक, २८ निरीक्षक, १०० उपनिरीक्षक, साडेचार हजार पोलीस कर्मचारी, १००० होमगार्ड, शीघ्र कृतीदलाच्या चार तुकड्या, एसआरपी ४ प्लॉटून
इमारत टेहाळणी पथक
विसर्जन मार्गावरील २३ इमारतींवर पोलीस कर्मचारी तैनात राहणार असून ते मिरवणुकीची टेहाळणी करणार आहेत़ शहरातील बेलदार गल्ली, सुरतवाला बिल्डिंग, कापडबाजार, शहाजी चौक, काटे गल्ली, नवीपेठ, छाया टॉकीज, रंगार गल्ली, मुंजाबा चौक आदींसह २३ ठिकाणी कर्मचारी तैनात राहणार आहेत़