शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीने झाला बँका, पतसंस्थांचा तोटा; कॅशलेसही फेल- काका कोयटे यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 18:41 IST

‘नोटाबंदीच्या निर्णयामुळे पतसंस्था व बँकिंग क्षेत्राला फायदा काही झाला नाही. झाला तो तोटाच झाला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले होते. आम्ही कॅशलेससाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. ही तयारी फेल गेली.

अहमदनगर : केंद्र सरकारच्या नोटाबंदीचा महाराष्ट्रासह अहमदनगर जिल्ह्यातील गावपातळीवरील सहकारी पतसंस्थांना फायदा होण्याऐवजी तोटाच अधिक झाल्याचे निरीक्षण महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना नोंदविले.८ नोव्हेंबरला नोटाबंदीच्या निर्णयाची वर्षपूर्ती होत आहे. या पार्श्वभूमीवर पतसंस्था व बँकिंग क्षेत्रात नोटाबंदीमुळे काय फायदे-तोटे झाले? या विषयी विचारले असता, ते म्हणाले, ‘नोटाबंदीच्या निर्णयामुळे पतसंस्था व बँकिंग क्षेत्राला फायदा काही झाला नाही. झाला तो तोटाच झाला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यानुसार या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहार वाढतील, असे वाटत होते. पण नंतर कॅशलेस व्यवहार वाढलेले दिसत नाहीत. पतसंस्था क्षेत्रात आम्ही कॅशलेससाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. ही तयारी फेल गेली.नोटाबंदीमुळे बँका व पतसंस्थांच्या कर्जवसुलीवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाला. कर्जवसुलीसाठी कर्ज थकबाकीदारांकडे बँका, पतसंस्थांचे प्रतिनिधी गेल्यास प्रत्येक जण नोटाबंदीचे कारण पुढे करून धंदा नाही, पैसा नाही, मंदी आहे, असे सांगत कर्ज भरण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे कर्जवसुलीस मोठा फटका बसला. नोटाबंदीनंतर व्यवसाय वाढतील, असे वाटत होते. पण तसे झालेले दिसत नाही. बँकिंग क्षेत्रावर नोटाबंदीचा सकारात्मक परिणाम होण्याऐवजी नकारात्मक परिणाम झाला आहे. केंद्र सरकारला खरेच कॅशलेस व्यवहार करायचे होते तर केंद्र सरकारला पतसंस्था हा चांगला पर्याय होता. शेवटच्या घटकापर्यंत सरकारी, योजनांचे लाभ पोहोचले पाहिजेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत म्हणत असतात. कॅशलेस व्यवहारासाठी सरकारला पतसंस्था हा शेवटच्या घटकापर्यंत पोहचणारा सर्वाधिक उपयुक्त पर्याय होता. आम्ही मोबाईल बँकिंग, मिनी एटीएम, थंब इप्रेशनद्वारे फक्त अंगठा टेकविला तर कोणत्याही बँकेचे व्यवहार पतसंस्थांमार्फत करणे, अशी जय्यत तयारी कॅशलेस व्यवहारांसाठी केली होती. पण त्यासाठी सरकारकडून काहीच प्रोत्साहन मिळाले नाही.पतसंस्थांच्या ठेवी गोळा करणाºया गरीब माणसांना दहा ते शंभर रुपये रोज मिळतो. पण त्यांच्याही कमिशनमधून जी.एस.टी.मुळे कर कपात सुरू झाली आहे. ग्रामीण भागात जागृती करणे गरजेचे होते. ती झालेली नाही. त्यामुळे अजूनही ग्रामीण भागात कॅशलेसऐवजी रोखीनेच व्यवहार होत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNote Banनोटाबंदी