जामखेडमध्ये घरफोडी : ५० हजारांचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 18:59 IST2018-05-18T18:57:44+5:302018-05-18T18:59:09+5:30
शहरातील तपनेश्वर गल्लीतील व्यावसायिक उमेश माळवदकर यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याची अंगठी, मोबाईल, रोख २० हजार रूपये असा एकूण ५० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला.

जामखेडमध्ये घरफोडी : ५० हजारांचा मुद्देमाल लंपास
जामखेड : शहरातील तपनेश्वर गल्लीतील व्यावसायिक उमेश माळवदकर यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याची अंगठी, मोबाईल, रोख २० हजार रूपये असा एकूण ५० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला.
माळवदकर यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाहेरील गेटचे कुलूप तोडून दोन चोरट्यांनी घरात प्रवेश करून लोखंडी कपाट तोडले. सामानाची उचकापाचक करून ही चोरी केली. गुरूवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास दोन चोरट्यांनी राहत्या घराबाहेरील गेटचे कुलूप तोडून स्वयंपाकघराबाहेरील सेफ्टी डोअर व त्यातील लाकडी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. चोरटे घरातील लोखंडी कपाट तोडून त्यातील सामानाची उचकापाचक करीत असताना फिर्यादी उमेश माळवदकर यांना जाग आली. त्यांनी दोघा चोरट्यांना हटकले असता चोरटे कपाटाच्या कप्प्यातील सोन्याची अंगठी, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ५० हजारांचा ऐवज घेऊन पसार झाले. माळवदकर यांनी आरडाओरड करीत दोन चोरट्यांचा पाठलाग केला. पण चोरटे पळून गेले. या चोरट्यांनी शेजारी बंद असलेल्या दोन तीन ठिकाणी घरफोड्या केल्या.