बाळ बोठे याला पारनेर येथून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:33 IST2021-05-05T04:33:30+5:302021-05-05T04:33:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : पारनेर येथील दुय्यम कारागृहातील आरोपींकडे काही दिवसांपूर्वी मोबाईल आढळून आले आहेत. याच कारागृहात रेखा ...

Bal Bothe from Parner | बाळ बोठे याला पारनेर येथून

बाळ बोठे याला पारनेर येथून

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : पारनेर येथील दुय्यम कारागृहातील आरोपींकडे काही दिवसांपूर्वी मोबाईल आढळून आले आहेत. याच कारागृहात रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे यालाही ठेवण्यात आले आहे. बोठे यानेही या मोबाईलचा वापर केल्याचा संशय असून, त्याला पारनेर येथून नगर येथील कारागृहात हलवावे, अशी मागणी मयत रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे व ॲड. सचिन पाटेकर यांनी केली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बोठे हा खुनाच्या गुन्ह्यासह विनयभंग व खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. आरोपींकडे सापडलेले मोबाईल बाळ बोठे याने वापरले असतील तर ही गंभीर बाब आहे. अशा परिस्थितीत बोठे याला पारनेर येथील कारागृहात न ठेवता त्याला नगर येथील कारागृहात ठेवावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: Bal Bothe from Parner