खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन बबनराव पडोळकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 10:42 IST2019-05-06T10:29:54+5:302019-05-06T10:42:51+5:30
नगर तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन तथा रासपचे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव पडोळकर यांचे सोमवारी (6 मे ) सकाळी निधन झाले आहे.

खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन बबनराव पडोळकर यांचे निधन
अहमदनगर - नगर तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन तथा रासपचे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव पडोळकर यांचे सोमवारी (6 मे ) सकाळी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, तीन मुलं असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी दुपारी 12 वाजता देऊळगाव सिद्धी येथे होणार आहे.
स्व. बबनराव पडोळकर हे नगर तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन, विद्यमान संचालक आहेत. तसेच ते देऊळगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक आहेत. देऊळगाव सिद्धी ग्रामपंचायतीचे ते 15 वर्ष सदस्य राहिले आहेत. ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. आमदार शिवाजी कर्डिले यांचे ते कट्टर समर्थक होते.