काळे महिला महाविद्यालयात ‘आजादी का अमृत महोत्सव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:21 IST2021-04-02T04:21:26+5:302021-04-02T04:21:26+5:30
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत २३ मार्च रोजी शहीद दिनानानिमित्त ‘भारताचा स्वातंत्र्यलढा’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. तसेच माहिती ...

काळे महिला महाविद्यालयात ‘आजादी का अमृत महोत्सव’
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत २३ मार्च रोजी शहीद दिनानानिमित्त ‘भारताचा स्वातंत्र्यलढा’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. तसेच माहिती व चित्र प्रदर्शन भरवण्यात आले. या उपक्रमात थोर स्वातंत्र्यसेनानी व महान व्यक्तीच्या जीवनावर आधारित माहिती व चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले. याचे उद्घाटन ३१ मार्च रोजी प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थिनींनी आपल्या पोस्टरच्या माध्यमांतून महात्मा गांधीजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, इंदिरा गांधी व इतर महान व्यक्तिमत्वाची सचित्र माहिती ऑनलाइन व्हिडिओ तयार करून देण्यात आली. कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. रामदास बर्वे, कार्यक्रम अधिकारी प्रा. सहदेव आव्हाड, प्रा. विलास एलके, डॉ. मंजुश्री भागवत, प्रा. शुभांगी ठुबे व स्वयंसेविका उपस्थित होत्या. आभार कार्यक्रम अधिकारी डॉ. योगीता रांधवणे यांनी मानले.