हिवरेबाजारला कृषी वीज धोरणाची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:14 IST2021-02-22T04:14:51+5:302021-02-22T04:14:51+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील हिवरेबाजार येथे कृषी वीज धोरण २०२०ची जनजागृती करण्यात आली. यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, ऊर्जा राज्यमंत्री ...

हिवरेबाजारला कृषी वीज धोरणाची जनजागृती
केडगाव : नगर तालुक्यातील हिवरेबाजार येथे कृषी वीज धोरण २०२०ची जनजागृती करण्यात आली.
यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी जि.प. अध्यक्ष बाबासाहेब भिटे, उपकार्यकारी अभियंता किसन कोपनर, तहसीलदार उमेश पाटील, पोलीस निरीक्षक रितेश राऊत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. हिवरे बाजारच्या इतर कामातील आदर्शांबरोबरच शेतीपंप वीजबिलाबरोबरच घरगुती विजेचा वापर, तसेच वसुलीबाबत हे गाव आदर्श आहे. २०१६-१७ मध्ये शासनाच्या कृषी संजीवनी या योजनेंतर्गत १०० टक्के शेतीपंपाची वीजबिल वसुली होणारे हे एकमेव गाव असावे. हिवरे बाजार येथे डीपी वाइज स्वतंत्र समिती स्थापन केलेली असून, त्यात अध्यक्ष व सचिव सदस्य हे त्या-त्या डीपीचे देखभाल दुरुस्तीचे कामे करतात. त्यामुळे मोटार व स्टार्टर बिघडण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे.