राष्ट्रीय पोषण कार्यक्रमांतर्गत पोषण आहाराबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:22 IST2021-09-19T04:22:36+5:302021-09-19T04:22:36+5:30
अहमदनगर : राष्ट्रीय पातळीवर सप्टेंबर महिना हा ‘राष्ट्रीय पोषण महिना’ म्हणून साजरा केला जात आहे. लोकसहभागातून भारताला कुपोषणमुक्त करण्याचा ...

राष्ट्रीय पोषण कार्यक्रमांतर्गत पोषण आहाराबाबत जनजागृती
अहमदनगर : राष्ट्रीय पातळीवर सप्टेंबर महिना हा ‘राष्ट्रीय पोषण महिना’ म्हणून साजरा केला जात आहे. लोकसहभागातून भारताला कुपोषणमुक्त करण्याचा या अभियानाचा उद्देश आहे. त्याअंतर्गत राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द (पाटीलवाडी) अंगणवाडीत जनजागृतीचा कार्यक्रम झाला. अंगणवाडी सेविका शोभा पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला.
यावेळी राहुरी पंचायत समिती सदस्य कमल लोंढे, सरपंच प्रकाश शिरसाठ, सदस्य स्नेहल शिरसाठ, दीपक शिरसाठ, बचतगट अध्यक्ष ललिता पाटील, संध्या जाधव, लीला बोरूडे, ज्योती लोखंडे आदी उपस्थित होते. यावेळी गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली तसेच लहान बालकांसाठीच्या दैनंदिन पोषण आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले. कुपोषणमुक्तीसाठी कोणता आहार कसा, किती प्रमाणात घ्यावा, याचे प्रात्यक्षिकच अंगणवाडी सेविकांनी दाखवले. त्यासाठी सर्वप्रकारच्या भाज्या, कडधान्ये, फळे कार्यक्रमात मांडण्यात आली होती.
-----------
फोटो - १८ पोषण आहार
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द (पाटीलवाडी) अंगणवाडीत राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमांतर्गत पोषण आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले.