रूपेशकुमार सुराणा, दिलीप शिंदे यांना पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:42 IST2021-02-05T06:42:50+5:302021-02-05T06:42:50+5:30

घोडेगाव : श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, सोनईचे सहायक पोलीस निरीक्षक करपे, अविनाश एळवंडे ...

Awarded to Rupesh Kumar Surana, Dilip Shinde | रूपेशकुमार सुराणा, दिलीप शिंदे यांना पुरस्कार प्रदान

रूपेशकुमार सुराणा, दिलीप शिंदे यांना पुरस्कार प्रदान

घोडेगाव : श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, सोनईचे सहायक पोलीस निरीक्षक करपे, अविनाश एळवंडे यांना कोरोना योद्धा, ‘लोकमत’ प्रतिनिधी दिलीप शिंदे यांना समाज गौरव, शिक्षक शिवराज तोंडे यांना समाजमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम घोडेगाव (ता.नेवासा) येथे पार पडला.

काशीनाथ चौगुले यांनी घोडेगाव येथे श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून महात्मा फुले बालसंगोपन केंद्र सुरू केले आहे. येथे ३५ मुलांची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमाचे यावेळी मान्यवरांनी कौतुक केले. अध्यक्षस्थानी कॉ. बाबा आरगडे होते.

प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ चौगुले यांनी संस्थेच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी सेवा संस्था अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र एळवंडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल सोनवणे, राजेंद्र पाटोळे, सिनेअभिनेते सुभाष सोनवणे, कवी आनंदा साळवे, किशोर कदम, तलाठी भूतकर, संस्थेचे उपाध्यक्ष शंकर सावंत, अमोल चौगुले, शिवाजी सावंत, संतोष चौगुले, अधीक्षक सागर शिंदे उपस्थित होते. सूत्रसंचालन बाबाजी शेगर यांनी केले. मोहन शेगर यांनी आभार मानले.

फोटो ओळी २९ घोडेगाव अवाॅर्ड

घोडेगाव येथे पुरस्कार स्वीकारताना दिलीप शिंदे. यावेळी काशीनाथ चौगुले, काॅ. बाबा आरगडे, सुभाष सोनवणे, अनिल सोनवणे, राजेंद्र पाटोळे.

Web Title: Awarded to Rupesh Kumar Surana, Dilip Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.