चुकीची दुरुस्ती करण्यास भूमी अभिलेखची टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:04 IST2021-01-08T05:04:54+5:302021-01-08T05:04:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहापूर येथील जमिनीची मोजणी करून पोटहिश्श्याचा चुकीचा नकाशा भूमी अभिलेख कार्यालयाकडून तयार करण्यात आल्याचा ...

चुकीची दुरुस्ती करण्यास भूमी अभिलेखची टाळाटाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शहापूर येथील जमिनीची मोजणी करून पोटहिश्श्याचा चुकीचा नकाशा भूमी अभिलेख कार्यालयाकडून तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावर कळस असा की, ही दुरुस्ती करण्यासाठी या कार्यालयाने शेतकऱ्यांकडूनच तातडीच्या मोजणीचे शुल्क भरून घेतले. हे शुल्क भरूनही दुरुस्ती करून देण्यास भूमी अभिलेख कार्यालयाकडून टाळाटाळ सुरू आहे.
शहापूर येथील गट क्रमांक ५९ अ -२ मधील १ हेक्टर ४५ आर जमिनीची हद्द कायम मोजणी करण्यासाठी दत्तात्रय लिंबाजी लंगोटे व अशोक लिंबाजी लंगोटे यांनी नगर तालुका भूमी अभिलेख कार्यालयाकडे अर्ज केला. भूमी अभिलेख कार्यालयातील मनोहर रोकडे यांनी सदर जमिनीची हद्द कायम करण्यासाठी मोजणी केली. मात्र ढेरे यांच्या सांगण्यावरून सदर जमिनीच्या पोटहिश्श्याचा नकाशा चुकीचा तयार करण्यात आला. ही बाब लंगोटे यांनी निदर्शनास आणून दिली. यावर तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील उपधीक्षकांनी फेर चौकशी करण्याचा आदेश दिला. त्यानुसार प्रत्यक्ष जागेवर येऊन वहीवाटीप्रमाणे नकाशा दुरुस्त करून दिला. त्यानुसार सातबारा व उताऱ्यावर नोंदही करण्यात आली. त्यानुसार हद्द कायम मोजणीसाठी अर्ज केला. अतितातडीचे शुल्कही भरले. वास्तविक पाहता चूक भूमी अभिलेख कार्यालयाचीच होती. असे असतानाही अतितातडीचे शुल्क भरले. मात्र, अद्याप हद्द कायम मोजणी करण्यात आली नसून, मोजणी करण्यास भूमी अभिलेख कार्यालयाकडून टाळाटाळ सुरू आहे.
....