अवतार मेहेरबाबांचा जन्मोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:25 IST2021-03-01T04:25:10+5:302021-03-01T04:25:10+5:30
--------------- व्यायामासाठी उद्यान खुले अहमदनगर : भुतकरवाडी येथील महालक्ष्मी उद्यान गत आठवडाभरापासून सकाळच्या व्यायामासाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे ...

अवतार मेहेरबाबांचा जन्मोत्सव रद्द
---------------
व्यायामासाठी उद्यान खुले
अहमदनगर : भुतकरवाडी येथील महालक्ष्मी उद्यान गत आठवडाभरापासून सकाळच्या व्यायामासाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे सकाळी व्यायामासाठी येणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र उद्यान सकाळच्या वेळेसाठी खुले करण्यात आले असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेकांनी उद्यानाकडे पाठ फिरवली आहे.
----------------
मास्क वापरण्याची शपथ
अहमदनगर : येथील स्नेहबंध फौंडशनतर्फे रविवारी मास्क वापरण्याबाबत आवाहन करणारी मोहीम राबविण्यात आली. सावेडी भागात सामाजिक अंतर राखून मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले. ज्यांना मास्क नाही, अशांना मास्कचेही वाटप करण्यात आले. यावेळी आम्ही मास्क वापरण्याची सर्वांनी शपथ घेतली.
---------------
बालभवनमध्ये विज्ञान दिन
अहमदनगर : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त स्नेहालयाच्या बालभवनमध्ये रविवारी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास माजी नगरसेवक धनंजय जाधव,गणेश घोरपडे, सुनील भवर,मनीषा कांबळे आदी उपस्थित होते. गेल्या बारा वर्षांपासून बालभवनमधील मुले आपल्या कल्पकता वापरून विविध उपकरणे तयार करीत आहेत.
---------------
स्नेहबंधतर्फे गोविलकर यांचा सत्कार
अहमदनगर : मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त स्नेहबंध फौंडेशनतर्फे लेखिका प्रा. डॉ. लीला गोविलकर यांचा अध्यक्ष उद्धव शिंदे यांच्या हस्ते शनिवारी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अतुल खामकर, हेमंत ढाकेफळकर, अमेय रेडकर, माधवी कुलकर्णी, अनिता खिस्ती, ज्योती केसकर उपस्थित होत्या. यावेळी लेखिका प्रा. डॉ. गोविलकर म्हणाल्या, आदर, सत्कार हा जवळच्या माणसाने करण्यापेक्षा अनोळखी व्यक्तीने केलेला सत्कार जास्त लक्षात रहातो.
स्नेहबंधचे अध्यक्ष शिंदे म्हणाले, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी गोविलकर यांचे कार्य मोठे आहे.