लेखापरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात
By Admin | Updated: October 26, 2016 00:55 IST2016-10-26T00:38:34+5:302016-10-26T00:55:15+5:30
अहमदनगर : पतसंस्थेचा चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर करण्यासाठी तक्रारदाराकडून मंगळवारी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील

लेखापरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात
अहमदनगर : पतसंस्थेचा चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर करण्यासाठी तक्रारदाराकडून मंगळवारी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील विशेष लेखापरीक्षक अनंत सुरेश तरवडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील वसंतदादा सहकारी पतसंस्थेचे १९९६ ते २०१२-१३ या कालावधीत झालेले लेखापरीक्षण हे सदोष, बोगस व सूडबुद्धीने केलेले असल्याबाबत तक्रारदारांनी सहकार खात्याकडे तक्रार अर्ज केला होता़ या तक्रार अर्जाची चौकशी करून अहवाल वरिष्ठांना सादर करण्यासाठी तरवडे याने तक्रारदाराकडे २१ आॅक्टोबर रोजी २ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली होती़ या रकमेपैकी ३० हजार रुपयांची रक्कम टोकण म्हणून देण्यात येणार होती़ याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती़ मंगळवारी दुपारी ठरलेल्या ठिकाणी तक्रारदाराकडून ३० हजार रुपये स्वीकारत असताना तरवडे याला रंगेहाथ पकडण्यात आले़ ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक इरफान शेख, निरीक्षक विष्णू आव्हाड, चंद्रशेखर सावंत, काशिनाथ खराडे, कॉन्स्टेबल सुनील पवार, एकनाथ आव्हाड, वसंत वाव्हळ, कल्याण गाडे, राजेंद्र सावंत, नितीन दगडे, तन्वीर शेख, प्रशांत जाधव यांच्या पथकाने केली़ (प्रतिनिधी)