अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:20 IST2021-02-12T04:20:50+5:302021-02-12T04:20:50+5:30

केडगाव : अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना दंड केल्यानंतर दंडाची रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविणाऱ्या वाहनांचा लिलाव करण्यात आला. ...

Auction of vehicles transporting illegal secondary minerals | अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांचा लिलाव

अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांचा लिलाव

केडगाव : अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना दंड केल्यानंतर दंडाची रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविणाऱ्या वाहनांचा लिलाव करण्यात आला. लिलावातून चाळीस लाखांचा महसूल जमा झाला आहे. वाहनांचा लिलाव नगर तालुका तहसील कार्यालयाच्या आवारात करण्यात आला. लिलावासाठी एकूण २८ वाहनांसाठी प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्याबाबतची उद्घोषणा प्रसिद्ध झाल्यानंतर सहा वाहन चालकांनी पंधरा लाख वीस हजार रुपये एका दिवसातच तहसील कार्यालयात जमा केले. उर्वरित २२ वाहनांचा लिलाव करण्यात आला. ज्यातून एकूण २४ लाखांचा महसूल जमा झाला.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महसूल विभागाचे वसुलीचे लक्ष दीडपट वाढवले आहे.

नगर तहसील कार्यालयास एकूण ३३ कोटी सहा लाख रुपयाचे वसुलीचे उद्दिष्ट दिले. या उद्दिष्टपूर्तीसाठी वाहनांची लिलाव हा एक मुख्य मार्ग म्हणून पुढे येत आहे. यामुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांवरही वचक बसणार आहे. लिलाव प्रक्रिया प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसीलदार अभिजीत बारवकर, गायके, महसूल सहायक इंगळ, महसूल सहायक गायकवाड, लहारे, कोतवाल आकाश करपे, देवेंद्र परदेशी यांच्या उपस्थितीत पार पडली.

Web Title: Auction of vehicles transporting illegal secondary minerals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.