जिल्हा बँकेची घोगरगाव शाखा लूटण्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 18:29 IST2017-08-23T18:28:02+5:302017-08-23T18:29:01+5:30
श्रीगोंदा (अहमदनगर) : तालुक्यातील घोगरगाव येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेचे शटर तोडून कॅश लुटण्याचा प्रयत्न झाला मात्र आजूबाजूचे लोक जागे झाल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला.

जिल्हा बँकेची घोगरगाव शाखा लूटण्याचा प्रयत्न फसला
श्रीगोंदा(अहमदनगर) : तालुक्यातील घोगरगाव येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेचे शटर तोडून कॅश लुटण्याचा प्रयत्न झाला मात्र आजूबाजूचे लोक जागे झाल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. लोक जागे झाल्याने चोरटे पळून गेले. दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले असून फुटेजच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत. घटना बुधवारी पहाटे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या श्रीगोंदा तालुक्यात १९ शाखा आहेत. त्यापैकी घोगरगाव येथे एक शाखा आहे. बुधवारी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बँकेचे मुख्य शटर उचकटून आत प्रवेश केला. काउंटरची उचकापाचक केली मात्र त्याठिकाणी त्यांना काहीही मिळाले नाही. दरम्यान परिसरातील नागरिक जागे झाले. यावेळी तिजोरी तोडण्याचा प्रयत्न करत असलेल्या चोरट्यांनी पळ काढला. घटनास्थळी एक लोखंडी टॉमी आढळली असून शाखाधिकारी एम. ए. उगले यांनी श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव, प्रकाश वाघ यांनी पाहणी केली. कॅश लुटीचा प्रयत्नावेळी घोगरगाव शाखेत १८ लाखाची कॅश होती. मात्र परिसरातील नागरिक जागे झाल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला.