कोपरगावात पोस्ट कार्यालयाची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 17:06 IST2019-09-18T17:06:24+5:302019-09-18T17:06:40+5:30
कोपरगाव शहरातील धारणगाव रोडवर असलेल्या पोस्ट कार्यालयाच्या इमारतीचे अज्ञात चोरट्याने मागील दरवाजाचे कुलूप तोडून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली.

कोपरगावात पोस्ट कार्यालयाची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न
कोपरगाव : शहरातील धारणगाव रोडवर असलेल्या पोस्ट कार्यालयाच्या इमारतीचे अज्ञात चोरट्याने मागील दरवाजाचे कुलूप तोडून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली.
या प्रकरणी कार्यालयाचे सब पोस्टमास्तर राजेश वासुदेवराव नेतनकर (रा.बोरावके वस्ती, धारणगांव रोड कोपरगाव) यांनी याबाबत पोलिसात फिर्याद आहे. मंगळवारी (दि.१७) रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पोस्ट कार्यालयाच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी आतील तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला. कपाटाचे लॉक तोडून व टेबलचे ड्रावर उघडून आतील सामानाची उचकापाचक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कोस्तेबल अमर गवसणे करीत आहेत.