डाक विभागाच्या सेवा लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST2021-07-14T04:24:21+5:302021-07-14T04:24:21+5:30
एस. रामकृष्ण हे एलरू (आंध्र प्रदेश) येथे सहायक अधीक्षक म्हणून रूजू होते. मागील ३ वर्षांपूर्वी ते पदोन्नतीवर अहमदनगर येथे ...

डाक विभागाच्या सेवा लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न
एस. रामकृष्ण हे एलरू (आंध्र प्रदेश) येथे सहायक अधीक्षक म्हणून रूजू होते. मागील ३ वर्षांपूर्वी ते पदोन्नतीवर अहमदनगर येथे वरिष्ठ पोस्टमास्तर म्हणून नियुक्त होते. तेथून श्रीरामपूर येथे त्यांनी दोन वर्षे अधीक्षक म्हणून काम पाहिले. आता पुन्हा ते अहमदनगर येथे प्रवर अधीक्षक डाकघर म्हणून पदोन्नतीवर बदलून आले आहेत.
नगर येथे त्यांचे पोस्टल संघटनेच्या वतीने संतोष यादव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी संघटनेचे विभागीय सचिव संदीप कोकाटे, शिवाजी जावळे, नामदेव डेंगळे, प्रकाश कदम, सागर पंचारिया, दीपक नागपुरे, कमलेश मिरगणे, नितीन थोरवे, विजय चाबुकस्वार, अनिल धनावत, दीपक कुंभारे आदी उपस्थित होते.
...............................
फोटो -
पोस्ट विभागाचे नूतन प्रवर अधीक्षक एस. रामकृष्ण यांचे स्वागत करताना नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईजचे पदाधिकारी.