शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

साईचरणी फुलण्याचा कमळाचा प्रयत्न?

By admin | Updated: March 26, 2024 14:37 IST

प्रमोद आहेर, शिर्डी महाआघाडीतील जागावाटपाचा गुंता सोडवताना शिर्डीच्या जागेसाठी भाजपाने आग्रह धरल्याचे वृत्त आहे़

प्रमोद आहेर, शिर्डीमहाआघाडीतील जागावाटपाचा गुंता सोडवताना शिर्डीच्या जागेसाठी भाजपाने आग्रह धरल्याचे वृत्त आहे़ शिर्डीसह श्रीरामपूरची जागा घेऊन उत्तरेत शिर्डी-श्रीरामपूर-नेवासे असा भाजपाचा बेल्ट तयार करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याची राजकीय गोटात चर्चा आहे़शिर्डी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तीर्थस्थळ असल्याने, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही साईभक्त असल्याने प्रतिष्ठेचा असणारा हा मतदारसंघ आपल्याकडे असावा, असा सेना-भाजपा दोन्हीचाही प्रयत्न आहे़ आजवर हा मतदार संघ शिवसेनेकडे होता़ मात्र यावेळी भाजपाला शिवसेनेकडून काही जागा अधिक मिळण्याचे संकेत असल्याने त्यात हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे़ त्यादृष्टीने येथील भाजपाचे शहराध्यक्ष राजेंद्र गोंदकर व जिल्हा उपाध्यक्ष नितीन कापसे हे राज्यस्तरीय नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे़ विशेष म्हणजे दोघेही संघाचे स्वयंसेवक आहेत़ गेल्या चार दिवसांपासून गोंदकर मुंबईत तळ ठोकून होते़ गेल्या महिन्यातच गोंदकर व कापसे यांनी नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन शिर्डी मतदारसंघाचे महत्व पटवून देत तो भाजपाकडे घेण्याचा आग्रह धरला होता़ शिवाय दोघांनीही उमेदवारीची तयारी दर्शवत फडणवीस यांना शिर्डीतून लढण्यासाठीही निमंत्रण दिले होते़याशिवाय काँग्रेसला रामराम करण्याच्या मन:स्थितीत असलेले जिल्हाध्यक्ष जयंत ससाणेही शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे़ शिर्डीची जागा किंवा साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद व श्रीरामपूरची जागा मिळावी असा त्यांचा प्रयत्न आहे़ या दोन्हीही जागा सेनेकडे असल्याने ससाणे सेनेच्या संपर्कात असले तरी त्यांची पहिली पसंती राष्ट्रीय राजकारणात प्रबळ असलेल्या भाजपाला आहे़ आता जागेच्या देव-घेवीत शिर्डी व श्रीरामपूर भाजपाकडे आले,तर ससाणे कैलास कोतेंसह भाजपाच्या गाडीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही़