पाथर्डीतील सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 09:05 IST2020-08-01T09:04:37+5:302020-08-01T09:05:24+5:30
पाथर्डी : शहरात शेवगाव पाथर्डी रोड वर असलेल्या सेंट्रल बँकेच्या एटीएम अज्ञात चोरट्यांनी काल रात्री साडेनऊ वाजता फोडण्याचा प्रयत्न केला.

पाथर्डीतील सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला
पाथर्डी : शहरात शेवगाव पाथर्डी रोड वर असलेल्या सेंट्रल बँकेच्या एटीएम अज्ञात चोरट्यांनी काल रात्री साडेनऊ वाजता फोडण्याचा प्रयत्न केला.
सदरील चोरटा सुरुवातीला एटीएम जवळ बसला होता त्यानंतर त्याने काही वेळाने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला यावेळी स्वयंचलित सुरक्षा यंत्रणेने हैदराबाद येथील मुख्यालयात याबाबत अलर्ट केले असता या ठिकाणावरून पाथर्डी सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकाला याबाबत सूचना देण्यात आल्या.
पाथर्डी पोलिसांना याबाबत तात्काळ माहिती होताच पोलीस घटना ठिकाणी दाखल झाले परंतु तोपर्यंत सदरील चोरटा पसार झाला होता घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक बँकेसमोर जमा झाले होते. गेल्या सहा महिन्यात परिसरात असलेल्या एटीएम फोडण्याचे अनेकदा प्रयत्न झाले असून चोरटे मात्र नेहमीच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यात यशस्वी होत आहेत.