राहुरी शहरात महावितरणसमोर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:38 IST2021-02-06T04:38:04+5:302021-02-06T04:38:04+5:30

महाराष्ट्र सरकारने महावितरण शेती वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली आहे; परंतु सर्व शेतकरी कोरोनामुळे अडचणीत आहेत. अतिवृष्टी ...

Attack in front of MSEDCL in Rahuri city | राहुरी शहरात महावितरणसमोर हल्लाबोल

राहुरी शहरात महावितरणसमोर हल्लाबोल

महाराष्ट्र सरकारने महावितरण शेती वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली आहे; परंतु सर्व शेतकरी कोरोनामुळे अडचणीत आहेत. अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यास त्रास देऊ नये आणि वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम तात्काळ थांबवावी; अन्यथा आगामी काळात भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा, यावेळी दिला आहे. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, रवींद्र म्हसे, सुभाष गायकवाड, राजेंद्र उंडे, शहाजी ठाकूर, भय्या शेळके, सुरेश बानकर, नंदकुमार डोळस, युवराज पवार, नानासाहेब गागरे, नारायण धोंडगे, सचिन मेहेत्रे, संदीप नेहे, बाळासाहेब शिंदे, बाबासाहेब गाडे, आदित्य दहिफळे, प्रभाकर हरिचंद्र, दीपक वाबळे, विक्रम गाडे, राजेंद्र चोपडे, रघुनाथ पवार, योगेश गीते, रामभाऊ मुंडे, दीपक दायमा, नानासाहेब पवार, रंगनाथ पवार उपस्थित होते.

( ०५ राहुरी आंदोलन)

Web Title: Attack in front of MSEDCL in Rahuri city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.