राहुरीतील तरूणीवर मुंबईत अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 11:08 IST2020-10-31T11:08:21+5:302020-10-31T11:08:40+5:30

राहुरी येथील तरुणीला मुंबई येथे बोलावून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी आरोपी विनायक तडसे याच्यावर राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Atrocities on a young woman from Rahuri in Mumbai | राहुरीतील तरूणीवर मुंबईत अत्याचार

राहुरीतील तरूणीवर मुंबईत अत्याचार

राहुरी : राहुरी येथील तरुणीला मुंबई येथे बोलावून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी आरोपी विनायक तडसे याच्यावर राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी तालुक्यातील एका महाविद्यालयात एक २७ वर्षीय तरुणी शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी विनायक राजेश तडसे (रा. नवी मुंबई)याने तरुणीला गेट टूगेदरच्या कार्यक्रमासाठी बोलावून घेतले. यावेळी जबरदस्तीने अत्याचार केला.

ही घटना नवी मुंबई येथील आरोपीच्या राहत्या घरात तसेच अलिबाग या ठिकाणी ११ जानेवारी २०२० ते १७ जुलै २०२० या दरम्यान घडली आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन बागुल हे करीत आहेत.

Web Title: Atrocities on a young woman from Rahuri in Mumbai