गुंगीचे औषध देऊन महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:22 IST2021-07-27T04:22:30+5:302021-07-27T04:22:30+5:30
याप्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. २०१७ ते १८ जुलै २०२१ दरम्यान ही घटना घडली. जाकीर शाहिन शेख, शहाबाज ...

गुंगीचे औषध देऊन महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार
याप्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. २०१७ ते १८ जुलै २०२१ दरम्यान ही घटना घडली. जाकीर शाहिन शेख, शहाबाज ऊर्फ मुन्ना शहाबाज शेख, निशाद शाहिन शेख (रा. तिघे सोनई, ता. नेवासा) व ओंकार मिलिंद चवंडके (रा. अहमदनगर) अशी आरोपींची नावे असून यातील निशाद शेख वगळता इतर तिघांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. नगर शहरातील पीडित तरुणी व आरोपी जाकीर शेख हे एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. दोघांची मैत्री झाली. या मैत्रीचा गैरफायदा घेत शेख याने २०१७ मध्ये तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. यावेळी आरोपीने त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने अश्लील व्हिडिओ चित्रीकरण केले. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने या तरुणीवर नगर शहरातील व सुपा येथील लॉजवर नेऊन वारंवार अत्याचार केला. यातून पीडिता गर्भवती राहिली तेव्हा आरोपीने त्याच्या साथीदाराच्या मदतीने तिचा गर्भपात घडवून आणला. या त्रासाला कंटाळून पीडित तरुणी व तिच्या कुटुंबीयांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महाजन हे पुढील तपास करत आहेत.