लॉजमध्ये नेऊन अल्पवीयन मुलीवर अत्याचार
By Admin | Updated: May 28, 2017 18:23 IST2017-05-28T18:14:12+5:302017-05-28T18:23:45+5:30
चौपाटी कारंजा परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली

लॉजमध्ये नेऊन अल्पवीयन मुलीवर अत्याचार
अहमदनगर, दि़ २८ - चौपाटी कारंजा परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी पीडित मुलीने शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शुभम नागेश कोमाकूल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शहरातील माळीवाडा परिसरात राहणाऱ्या शुभम कोमाकूल याने १६ मे रोजी सदर अल्पवयीन मुलीस माझे आणि मैत्रिणीचे भांडण झाले असून तू तिला समजावून सांग असे म्हणून तिला तो ब्राह्मण गल्ली येथील पांचाली लॉजवर घेऊन गेला़ तेथे सदर मुलीवर शुभम याने दोन वेळेस जबरदस्तीने अत्याचार केला़ तसेच या घटनेबाबत कुठे वाच्यता केली तर तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली़ या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड हे करत आहेत़