संगमनेरात १८ वर्षांच्या युवतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:25 IST2021-09-15T04:25:39+5:302021-09-15T04:25:39+5:30

संगमनेर : प्रेमसंबंध जुळलेल्या एका १८ वर्षीय युवतीशी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणाऱ्या १९ वर्षीय युवकाविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ...

Atrocities on 18 year old girl in Sangamnera | संगमनेरात १८ वर्षांच्या युवतीवर अत्याचार

संगमनेरात १८ वर्षांच्या युवतीवर अत्याचार

संगमनेर : प्रेमसंबंध जुळलेल्या एका १८ वर्षीय युवतीशी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणाऱ्या १९ वर्षीय युवकाविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडित युवतीने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

अरबाज पठाण (वय १९, रा. अकोले नाका, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणी व अरबाज पठाण यांची ओळख होती. त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर पठाण याने युवतीसोबत इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. युवतीने पठाण याला लग्नासाठी विचारणा केली असता त्याने माझ्या घरातील लोक लग्नास तयार होत नाहीत, असे सांगून लग्नाला नकार दिला, असे युवतीने दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

शुक्रवारी (दि. १०) पीडित युवतीने घरी विषारी द्रव्य सेवन केल्याने तिला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी (दि. १३) शुद्धीवर आल्यानंतर तिने दिलेल्या जबाबावरून पठाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले या अधिक तपास करीत आहेत. पठाण याला गुरुवार (दि. १६)पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे सहायक पोलीस निरीक्षक कोकाटे यांनी सांगितले.

Web Title: Atrocities on 18 year old girl in Sangamnera