शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना दीडपट हमीभावाचे केंद्राचे आश्वासन - अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 16:45 IST

राळेगणसिध्दीत अण्णांचे जल्लोषात स्वागत

राळेगणसिद्धी : शेतक-यांना दीड पट हमी भाव देण्याचे लेखी आश्वासन पंतप्रधान कार्यालयाच्या मंत्र्यांनी दिले आहे. शेतमालाला हमीभाव मिळाला तर त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागतील. पुढील काळात शेतक-यांच्या आत्महत्या थांबण्यास मदत होईल, असा आशावाद ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला.नवीदिल्ली येथे रामलिला मैदानावर सात दिवसांच्या उपोषणाच्या सांगतेनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शनिवारी (दि.३१) राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यावेळी अण्णांनी संत यादवबाबा यांचे दर्शन घेतले. त्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना अण्णा हजारे बोलत होते.राळेगणसिद्धीकडे येताना पुणे विमानतळ, वाघोली, रांजणगाव गणपती, वाडेगव्हाण येथेही नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. सरपंच रोहिणी गाजरे, माजी सरपंच मंगल मापारी, सीमा औटी, कौशल्या हजारे, शैला भालेकर, रेखा पठारे, रेखा औटी, हिराबाई पोटे, निर्मला आवारी या महिलांनी अण्णांचे औंक्षण केले. हजारे पुढे म्हणाले, रामलीला मैदानावरील आंदोलनाला पाठिंबा म्हणून राळेगणसिद्धी परिवाराने सात दिवस वेगवेगळे उपक्रम राबवून साथ दिली. त्यामुळे मला आंदोलनासाठी मोठी उर्जा मिळाली. एका गावाची ताकद काय असते, हे राळेगणसिद्धीने भारत सरकारला दाखवून दिले. शेतात राबराब राबणा-या शेतक-यांच्या पिकाला मोबदला मिळत नसल्याने आत्महत्या वाढल्या. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळाला तर या आत्महत्या थांबतील. दुधालाही चांगला भाव मिळायला हवा, असे ते म्हणाले. हजारे यांनी दिवसभर संत यादवबाबा मंदिरात विश्रांती घेतली. सायंकाळी ग्रामसभेत विजयोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे उपसरपंच लाभेष औटी यांनी सांगीतले. यावेळी माजी सरपंच जयसिंग मापारी, आदर्श पतसंस्थेचे संचालक रमेश औटी, विलास औटी, गणपत पठारे, सुरेश पठारे, दादा पठारे, डॉ. धनंजय पोटे, शरद मापारी, दत्ता आवारी, दादाभाऊ गाजरे, प्राचार्य सोमनाथ वाकचौरे, सुभाष पठारे, अरुण भालेकर, महेंद्र गायकवाड, नाना लंके, गणेश आवारी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेParnerपारनेरAhmednagarअहमदनगर