कोपरगावात आशुतोष काळे यांचा शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 16:15 IST2019-10-04T16:13:56+5:302019-10-04T16:15:12+5:30
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांनी शुक्रवारी दुपारी शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल केला.

कोपरगावात आशुतोष काळे यांचा शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल
कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांनी शुक्रवारी दुपारी शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल केला.
कोपरगाव शहरातील अण्णाभाऊ साठे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आशुतोष काळे यांनी शुक्रवारी दुपारी अभिवादन केले. यानंतर शहरातून हजारो कार्यकर्त्यांसह वाजतागाजत, जोरदार शक्ती प्रदर्शन करीत रॅली काढली होती. कोपरगाव तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी माजी आमदार अशोक काळे, चैताली काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगुले, पद्माकांत कुंदळे, संभाजी काळे, काँग्रेसचे अशोक खांबेकर, पुष्पाताई काळे, दीपक साळुंके, विजय आढाव, कारभारी आगवन, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील साळुंके, तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, तुषार पोटे, आरपीआय कवाडे गटाचे तालुकाध्यक्ष वसंत ननवरे, हरीभाऊ जगताप, नगरसेवक महेमूद सय्यद यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.