अशोकनगर फाटा ते कारेगाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:20 IST2021-07-26T04:20:15+5:302021-07-26T04:20:15+5:30
श्रीरामपूर : अशोकनगर फाटा ते कारेगाव रस्ता अतिशय खराब झाला आहे. चारचाकी व दुचाकी वाहने चालविण्यासाठी मोठी कसरत करावी ...

अशोकनगर फाटा ते कारेगाव
श्रीरामपूर : अशोकनगर फाटा ते कारेगाव रस्ता अतिशय खराब झाला आहे. चारचाकी व दुचाकी वाहने चालविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याचे दुरुस्तीचे, तसेच कारेगावजवळील ओढ्यावर सीडी वर्कचे काम तत्काळ सुरू करावे, अन्यथा अशोकनगर फाटा येथे श्रीरामपूर-नेवासे मार्गावर सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अशोक कारखान्याचे अध्यक्ष भाऊसाहेब कहांडळ, माजी अध्यक्ष सोपान राऊत यांच्या उपस्थितीत आमदार लहू कानडे, प्रांताधिकारी अनिल पवार यांना निवेदन देण्यात आले.
जागोजागी रस्ता खचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे प्रवासाची गैरसोय झालेली असून, रस्त्यावरील अपघाताचे प्रमाणही वाढलेले आहे. लोकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे. कारेगावजवळ ओढ्याला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी येते. त्यामुळे दुर्घटना घडण्याचा संभव नाकारता येत नाही, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर भाऊसाहेब उंडे, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे, विठ्ठल राऊत, अॅड.डी.आर. पटारे, आशिष दोंड, बबनराव उंडे, प्रमोद उंडे, मारुती पटारे आदींच्या सह्या आहेत.
--------