आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे झाले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:21 IST2021-01-03T04:21:50+5:302021-01-03T04:21:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शेवगाव : कोरोना संसर्गाच्या धर्तीवर ग्रामपंचायतींना नागरिकांना वाटप करण्यासाठी पुरवठा करण्यात आलेल्या रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या ‘आर्सेनिक ...

आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे झाले पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
शेवगाव : कोरोना संसर्गाच्या धर्तीवर ग्रामपंचायतींना नागरिकांना वाटप करण्यासाठी पुरवठा करण्यात आलेल्या रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या ‘आर्सेनिक अल्बम’ गोळ्या निकृष्ट दर्जाच्या आढळून आल्याने शेवगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्या तालुक्यात हा प्रकार उघड झाला आहे.
ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगाच्या रकमेवरील व्याज जिल्हा परिषदेने जमा करुन घेऊन त्याच्या मोबदल्यात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लागणाऱ्या आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला. सदर गोळ्या अहमदनगर जिल्हा परिषद करिता सुमन होमिओ फार्मसी (पुणे) यांनी पुरवठा केल्या आहेत. मात्र त्या डब्यात गोळ्याऐवजी पाणी, तसेच घट्ट झालेला पांढरा द्रव पदार्थ तयार झाला आहे. यामुळे गोळ्यांच्या दर्जा बाबत शंका उपस्थित झाल्या आहेत.
तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांसाठी वाटप करण्यासाठी आणलेल्या १४ पाकिटातील डब्या उघडल्या असता हा गंभीर प्रकार समोर आला आहे.
विशेष बाब म्हणजे जिल्हा परिषदेच्या खात्यावर तब्बल पाच महिन्यांपूर्वी १ लाख ४८ हजार ७६० रुपये इतकी रक्कम सदर गोळ्यासाठी जमा केली होती. पंचायत समितीमधून गोळ्या घेऊन जाण्यासाठी फोन आला असता ३१ डिसेंबर रोजी ग्रामपंचायतचे शिपाई बबन बोरुडे हे गोळ्यांचे पाकीट घेऊन आले होते.
....
नागरिकांचा गोळ्या घेण्यास नकार
शनिवारी सकाळी नागरिकांना सदर गोळ्या वाटप करण्यासाठी घेतल्या असता बहुतांश डब्यात पातळ द्रव व घट्ट झालेला द्रव दिसून आला. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश भलसिंग यांनी ही बाब समोर आणली. यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांना या गोळ्या घेण्यास नकार दिला.
...
फोटो-०२
....
ओळी-वाघोली ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांसाठी वाटप करण्यासाठी आणलेल्या १४ पाकिटातील डब्या उघडल्या असता त्यात गोळ्यांचे पाणी झालेले आढळून आले.