पारगाव फाट्यावरील मार्केटमध्ये नवीन कांद्याची आवक

By | Updated: December 7, 2020 04:15 IST2020-12-07T04:15:14+5:302020-12-07T04:15:14+5:30

श्रीगोंदा : तालुक्यातील पारगाव सुद्रिक फाट्यावरील चैतन्य बाजार समितीत रविवारी दीड हजार कांदा गोण्यांची आवक झाली. यामध्ये ७० टक्के ...

Arrival of new onions in the market at Pargaon fork | पारगाव फाट्यावरील मार्केटमध्ये नवीन कांद्याची आवक

पारगाव फाट्यावरील मार्केटमध्ये नवीन कांद्याची आवक

श्रीगोंदा : तालुक्यातील पारगाव सुद्रिक फाट्यावरील चैतन्य बाजार समितीत रविवारी दीड हजार कांदा गोण्यांची आवक झाली.

यामध्ये ७० टक्के नवीन कांदा होता. या कांद्याला २० ते २५ रुपये किलोप्रमाणे भाव मिळाला. चैतन्य बाजार समितीच्या संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या कांदा आणि लिंबाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी सात नवीन व्यापाऱ्यांना बाजार समिती आवारात जागा उपलब्ध करून दिली आहे. तसेच शेतकऱ्यांना कांदा, लिंबू विकले की, तासात पैसे देण्याची व्यवस्था केली आहे. रविवारी दीड हजार कांदा गोण्यांची आवक झाली. जुन्या कांद्याला १० ते १५ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. तर नवीन कांद्याला २० ते २५ रुपये भाव मिळाला. लिंबाला १० ते १२ किलोप्रमाणे भाव लिलाव पद्धतीने निघाला.

चौकट....

पारगाव फाट्यावरील मार्केटमधून भाजीपाला फळे परदेशात निर्यात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मध्यंतरी नेपाळमध्ये टाेमॅटो पाठविण्यात आला होता. त्यातून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला.

कांद्याचे देशात भाव पडले आहेत, अशा परिस्थितीत कांद्याला इतर मार्केटपेक्षा चांगला भाव द्यावा, अशा सूचना व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे कांद्याची आवक वाढली.

-विठ्ठलराव वाडगे,

अध्यक्ष, चैतन्य बाजार समिती, पारगाव फाटा

फोटो : ०६ पारगाव फाटा

पारगाव फाटा येथील चैतन्य बाजार समितीमध्ये जमा झालेला कांदा.

Web Title: Arrival of new onions in the market at Pargaon fork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.