स्वस्तात जमीन देण्याचे आमिष दाखवून लुटमार करणारे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:27 IST2020-12-30T04:27:33+5:302020-12-30T04:27:33+5:30
जितेंद्र भारत ऊर्फ दुधकल्या भोसले (वय ३१, रा. घाेसपुरी, ता. नगर) व राहुल टकऱ्या भोसले (वय २७, रा. पिंपळगावपिसा, ...

स्वस्तात जमीन देण्याचे आमिष दाखवून लुटमार करणारे जेरबंद
जितेंद्र भारत ऊर्फ दुधकल्या भोसले (वय ३१, रा. घाेसपुरी, ता. नगर) व राहुल टकऱ्या भोसले (वय २७, रा. पिंपळगावपिसा, ता. श्रीगोंदा) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांसह त्यांचे साथीदार करण भारतदुधकल्या भोसले, अनिल टकाऱ्या भोसले व देवेंद्र भारतदुधकल्या भोसले यांनी २६ डिसेंबर रोजी हवेली येथील अजिंक्य चंद्रकांत गोगावले (वय २६) याला चिखली येथे बोलाविले होते. या ठिकाणी आरोपी यांनी गोगावले याच्यावर दगडफेक व मारहाण करून त्याच्याकडील मुद्देमाल लुटला होता. याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने दोघा आरोपींना अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.