गावठी कट्टा विकणाऱ्यासह घेणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:18 IST2021-05-17T04:18:24+5:302021-05-17T04:18:24+5:30
इक्बाल ऊर्फ सोनू सिकंदर शेख व सोहेल सय्यद अब्दुलगणी (रा. दोघे गजराजनगर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. गजराजनगर ...

गावठी कट्टा विकणाऱ्यासह घेणाऱ्यास अटक
इक्बाल ऊर्फ सोनू सिकंदर शेख व सोहेल सय्यद अब्दुलगणी (रा. दोघे गजराजनगर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. गजराजनगर येथे एकजण गावठी कट्टा विकणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली होती. माहितीनुसार पोलीस पथकाने इक्बाल शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गावठी कट्टा शेवगाव येथील दीपक कपिले याच्याकडून विकत घेऊन सोहेल अब्दुलगणी याला विकला असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी सोहेल यालाही अटक करत त्याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. इक्बाल शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात कोतवाली, श्रीरामपूर व शेवगाव पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तसेच सोहेल अब्दुलगणी याच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.