आरोपींना तातडीने अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:45 IST2020-12-17T04:45:16+5:302020-12-17T04:45:16+5:30
बिलोली (जि. नांदेड) येथील मतिमंद मुलीवर काही नराधमांनी अत्याचार करुन तिचा खून करण्यात आला असून त्या घटनेतील सर्व आरोपींवर ...

आरोपींना तातडीने अटक करा
बिलोली (जि. नांदेड) येथील मतिमंद मुलीवर काही नराधमांनी अत्याचार करुन तिचा खून करण्यात आला असून त्या घटनेतील सर्व आरोपींवर कायद्याच्या तरतुदीप्रमाणे पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करावी. नांदेड येथील एका मतिमंद मुलीवर अत्याचार करुन तसेच दगडाने तिचा चेहरा ठेचून त्या निरपराध मुलीची काही नराधमांनी अमानुषपणे हत्या केली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात महिला बालकांच्या सुरक्षिततेसाठी व संरक्षणासाठी नुकताच शक्ती व दिशा कायदा महाविकास आघाडी सरकारतर्फे करण्यात आला आहे. राज्य सरकार हे अत्याचारासारख्या गुन्ह्यांना रोखण्यात अपयशी ठरले आहे.
हे प्रकरण नव्या कायद्याच्या तरतुदीनुसार चालविण्यात यावा. गुन्ह्याचा निकाल नवीन कायद्याच्या तरतुदीखाली त्वरित लावण्यात यावा. तसेच कायद्याखाली दावा चालवताना कायदेशीर बाबींची त्रुटी राहू नये म्हणून या गुन्ह्याचा तपास निःपक्षपातीपणे करण्यात येऊन त्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी. गुन्ह्याच्या तपासकामी सरकारी कर्मचारी पंच म्हणून हवेत तसेच येणारा वैद्यकीय अहवाल व त्याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर लहुजी सेनेचे जिल्हाप्रमुख पोपटराव सरोदे, जिल्हा कार्याध्यक्ष शंकर भारस्कर, राज्य सल्लागार दीपक इंगळे, नेवासा तालुकाप्रमुख आप्पासाहेब काळोखे, उपप्रमुख सुरेश संकट, पाचुंदा शाखा प्रमुख बाळासाहेब वैरागळ, गंगाधर वाघ, रामचंद्र काळोखे, विजय शिरसाठ, अमोल काळोखे, ज्ञानेश्वर काळोखे यांच्या सह्या आहेत.
( फोटो )