संगमनेर तालुक्यात ८५० शासकीय बेडची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:20 IST2021-04-02T04:20:38+5:302021-04-02T04:20:38+5:30

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. संगमनेर तालुक्यात आतापर्यंत आठ हजारांहून अधिक जणांना कोरोनाची ...

Arrangement of 850 government beds in Sangamner taluka | संगमनेर तालुक्यात ८५० शासकीय बेडची व्यवस्था

संगमनेर तालुक्यात ८५० शासकीय बेडची व्यवस्था

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. संगमनेर तालुक्यात आतापर्यंत आठ हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील १७, तर ग्रामीण भागातील ४६, अशा एकूण ६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची शासकीय नोंद आहे. सध्या शहर व तालुक्यात कोरोनाची लागण झालेले एकूण ६९८ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती संगमनेर पंचायत समितीच्या तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. सौम्य लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना पूर्वी गृहविलगीकरणात ठेवण्यात येत होते; परंतु काही ठिकाणी गृहविलगीकरणात असलेले रुग्ण बेफिकिरीने वागत असल्याचे प्रशासनाला आढळून आले. कोरोनाचा धोका अधिक वाढत असल्याने गृहविलगीकरण बंद करण्यात आले आहे.

--------------------

संगमनेर तालुक्यात ६९८ ॲक्टिव्ह रुग्ण

उपचारांची ठिकाणे रुग्णसंख्या

कोविड हेल्थ केअर सेंटर : ४१

विशेष कोविड-१९ आरोग्य केंद्र : ४५

खासगी रुग्णालये : २९७

गृहविलगीकरण : ३१५

एकूण ॲक्टिव्ह रुग्ण : ६९८

------------------

१३० रुग्णांना प्राणवायूची गरज

संगमनेर तालुक्यातील ६९८ ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांपैकी १३० रुग्णांना कृत्रिम प्राणवायूची गरज भासत आहे, तर ८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. गुरुवारी (दि.१) संगमनेर तालुक्यात ६४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

--------------------

गृहविलगीकरण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेल्या घरीच राहून उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना शासकीय कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल होणे बंधनकारक आहे. प्रशासनाला सहकार्य करावे, कारवाईचे कडक धोरण हाती घेण्यात आले असून, नियमांचा भंग करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील.

-अमोल निकम, तहसीलदार, संगमनेर

Web Title: Arrangement of 850 government beds in Sangamner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.