शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

रणगाडा संग्रहालयात लष्कराचे प्रदर्शन

By admin | Updated: August 17, 2015 00:02 IST

अहमदनगर : पहिल्या, दुसऱ्या महायुद्धात सहभागी रणगाडे, सध्या लष्करी ताफ्यात असलेली यांत्रिकी सामग्री, विविध क्षेपणास्त्रे, बंदुका याची माहिती देत

अहमदनगर : पहिल्या, दुसऱ्या महायुद्धात सहभागी रणगाडे, सध्या लष्करी ताफ्यात असलेली यांत्रिकी सामग्री, विविध क्षेपणास्त्रे, बंदुका याची माहिती देत येथील आर्मर्ड कोअर सेंटर अ‍ॅण्ड स्कूलच्या लष्करी अधिकाऱ्यांनी नगरकरांना सैन्यदलाची ओळख करून दिली. स्वातंत्र्यदिनी सोलापूर रस्त्यावरील रणगाडा संग्रहालयात एसीसी अ‍ॅण्ड एसतर्फे ‘नो यूवर आर्मी’ हा लष्करी विभागाचा माहितीपर उपक्रम राबवण्यात आला. नगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या लाडक्या सैन्यदलातील कामकाजाची माहिती कुतूहलाने जाणून घेतली. रणगाडा संग्रहालय राष्ट्रीय सण असताना नागरिकांसाठी खुले करण्यात येते. याला जोडून लष्कराने यंदा हा आगळावेगळा उपक्रम राबवला. भल्या सकाळीच येथे लष्कराच्या ताफ्यात असलेले लढाऊ रणगाडे दाखल झाले. सैन्याचे स्फूर्तीदायक बॅण्डपथक, लष्करी भरतीचे मार्गदर्शन, तसेच विविध क्षेपणास्त्रे याची माहिती नागरिकांना लष्करी अधिकारी देत होते. लहान मुलांसह हौशी सैन्यप्रेमींनी प्रत्यक्ष रणगाड्यात बसून त्याची माहिती घेतली. बंदूक कशी चालवावी, क्षेपणास्त्रे केव्हा डागतात, रणगाड्यांचे युद्धातील योगदान आदींसह अनेक प्रश्नांची उत्तरे लष्करी अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिली. दरम्यान, सैनिकी बॅण्डच्या निनादात, देशभक्तीपर गीते अशा प्रसन्न वातावरणात नागरिकांना सैन्यदलाची सफर घडली. (प्रतिनिधी)