लष्कराचा बॉम्ब फुटला : दोन नागरिकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 10:31 IST2019-07-10T10:30:24+5:302019-07-10T10:31:57+5:30
लष्कराच्या सरावक्षेत्रातील बॉम्ब निकामी झाल्याचे समजून त्यामधील शिसे काढण्याच्या प्रयत्न केल्यामुळे झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला.

लष्कराचा बॉम्ब फुटला : दोन नागरिकांचा मृत्यू
अहमदनगर : लष्कराच्या सरावक्षेत्रातील बॉम्ब निकामी झाल्याचे समजून त्यामधील शिसे काढण्याच्या प्रयत्न केल्यामुळे झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला. अक्षय नवनाथ गायकवाड, संदीप भाऊसाहेब धिरोडे अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
नगर शहराजवळील खारेकर्जुने येथे लष्कराचा दैनंदिन बॉम्बस्फोटांचा सराव सुरू असतो. हा सराव संपल्यानंतर गावातील काही लोक बॉम्बचे निकामी भंगार गोळा करण्यासाठी या मैदानावर येतात. असाच एक बॉम्ब येथील दोन नागरिकांना सापडला. तो निकामी असल्याचे समजून त्यांनी तो घरी नेला. त्यातील शिसे काढण्यासाठी तो फोडला असता त्याचा जोरदार धमाका होऊन दोघांचाही जागीच मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.