शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या शस्त्रावर टाच!

By admin | Updated: December 15, 2015 23:17 IST

अहमदनगर : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा प्रशासनाने नेत्यांच्या शस्त्रावर टाच आणली आहे.

अहमदनगर : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा प्रशासनाने नेत्यांच्या शस्त्रावर टाच आणली आहे. यात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले, खासदार दिलीप गांधी आणि माजी आमदार अनिल राठोड या प्रमुख नेत्यांसह ६१ जणांच्या समावेश असून त्यांच्या बंदुका सरकार जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिले आहेत़ विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे़ दिग्गज नेते रिंगणात आहेत़ बड्या नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे़ त्यात मतदार संख्या मर्यादित आहे़ मतदारांचा कौल मिळविण्यासाठी वाट्टेल ते, असे चित्र सध्या तरी आहे़ त्यात साम, दाम, दंड आणि भेद यासारख्या नितीचा वापर होणार असल्याचे संकेत जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी मध्यंतरीच्या मतदार मेळाव्यात दिले़ त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे़ याचाच एक भाग म्हणून आमदार, खासदारांचे मागील कारनामे लक्षात घेऊन त्यांच्या बंदुका जमा करण्याचा निर्णय झाला आहे़ पोलिसांनी आमदार, खासदारांसह ६१ जणांचा अहवाल सादर केला होता़ त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी कवडे यांनी वरील आदेश दिले आहेत़ हाती आलेल्या अहवालानुसार भाजपाचे खासदार दिलीप गांधी, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, आमदार शिवाजी कर्डिले, सेनेचे माजी आमदार अनिल राठोड, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे, बिपीन शंकरराव कोल्हे, माजी आमदार अशोक काळे, विजय गडाख, यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख, जिल्हा परिषद सदस्य संभाजी दहातोंडे आणि राष्ट्रवादीचे प्रताप बबनराव ढाकणे यांचे शस्त्र जमा करणाऱ्यांच्या यादीत नावे आहेत़ वरील सर्व राजकीय नेत्यांना शस्त्र जमा करण्याच्या नोटिसा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत़ त्यांनी स्वत: आपल्याकडील शस्त्र जमा करायचे आहेत, अन्यथा पोलिसांकडून जमा करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले़ (प्रतिनिधी)