शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अरे एवढे दिवस झोपा काढल्या का? अजित पवारांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 16:18 IST

"राज्यात काही जण अचानक बाहेर निघाली आणि अचानकच भोंगे बंद करण्याची भाषा करू लागली आहेत," अजित पवार यांचं वक्तव्य

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील पोलीस ठाणे इमारत, बसस्थानक, पंचायत समिती इमारत उद्घाटन तसेच शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आदी कामांचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भाषणादरम्यान अजित पवारांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचं नाव न घेता टीका केली. "राज्यात काही जण अचानक बाहेर निघाली आणि अचानकच भोंगे बंद करण्याची भाषा करू लागली आहेत. अरे एवढे दिवस काय झोपा काढल्या होत्या काय?,"| असा सवाल त्यांनी केला.

"भोंग्या बद्दल बोलणाऱ्यांपैकी मागील सरकारमध्ये कोणी नव्हते का? सध्या काही लोक अशाच वेगवेगळ्या गोष्टी पुढे आणायचं काम करतायेत. विकासाला महत्त्व देण्याऐवजी वेगळी चर्चा समाजात घडवून आणायची समाजात वितुष्ट कसे निर्माण होईल, दरी कशी निर्माण होईल हे पाहिलं जात आहे. आपण किती वर्षांपासून महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने राहत आहोत. एकमेकांच्या सणांचा आदर करतोय. एकमेकांना शुभेच्छा देतो आहोत. ही आपली संस्कृती हीच आपली परंपरा आहे," असं अजित पवार म्हणाले. "छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आहे. शाहू-फुले-आंबेडकरांनी हाच विचार मांडला आहे. अशा भोंग्याच्या गोष्टी करून विकास होत नाही. विकासाला आपण महत्त्व देऊ या," असंही त्यांनी नमूद केलं.

आम्ही तीनही पक्षांचे लोक वेगवेगळ्या विचारधारेचे असूनही लोकांचे भले करण्यासाठी एकत्र आलो असल्याचंही पवार म्हणाले. या कार्यक्रमाला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे, माजी आमदार अशोक काळे, आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, दादाभाऊ कळमकर, चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले, रयत शिक्षण संस्थेच्या मिनाताई जगधने,  चैताली काळे, सुरेश वाबळे आदी उपस्थित होते.

"पुढील वेळी मताधिक्य वाढलं पाहिजे""आम्ही सात-सात वेळेला लाखा-लाखाने निवडून गेलो. या वेळी आम्हाला कस बस निवडून आणले आहे. मी तर माझ्या एक राऊंडला हजारो मते घेतो. हसन मुश्रीफ ४० हजार, वळसे पाटील ६० हजार तर मी एक लाख २० हजार मताधिक्याने निवडून आलो. ही कामे करताना आम्ही साधू-संत नाही. आम्ही माणसे आहोत. आमच्या विचारांचा तरूण माणूस निवडून दिला, म्हणून ही विकासकामे देतोय. मात्र पुढच्या वेळी मताधिक्या वाढले पाहिजे ही हात जोडून विनंती," असंही ते म्हणाले. अजित पवारांनी करताच उपस्थित काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. हे पाहून अजित पवार म्हणाले, "घोडा मैदान दूर नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत तुम्ही काय करता ते पाहू. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत मी सांगितलेली कामे केली नाहीत तर पाहा पवारांची औलाद नाही. अशी आहे का धमक तुमची, असा दमही अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भरला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्र