वीज उपकेंद्राला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:21 IST2021-09-25T04:21:20+5:302021-09-25T04:21:20+5:30
नेवासा तालुक्यातील विजेच्या प्रश्नासंदर्भात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस ...

वीज उपकेंद्राला मंजुरी
नेवासा तालुक्यातील विजेच्या प्रश्नासंदर्भात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे उपस्थित होते. या बैठकीत तालुक्यातील धनगरवाडी आणि घोगरगाव या दोन ठिकाणी प्रत्येकी ३३ केव्हीच्या वीज उपकेंद्र प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यातील घोगरगाव उपकेंद्राच्या कामाला लगेचच सुरुवात करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करून एका वर्षात हे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले आहे.
या उपकेंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विजेबाबतच्या समस्या कायमच्या दूर होणार आहेत. नेवासा तालुक्यातील प्रत्येक गावातील उपलब्ध एसीएफच्या निधीतून उर्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश महावितरणच्या अधिकाऱ्यांना तनपुरे यांनी दिले आहेत. या बैठकीसाठी महावितरणचे प्रकल्प संचालक भालचंद्र खांडाईत, अधीक्षक अभियंता प्रवीण परदेशी, अधीक्षक अभियंता श्सुनील काकडे, नगर ग्रामीणचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत काकडे उपस्थित होते.