शेवगाव नगर परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 12:17 IST2021-02-07T12:15:56+5:302021-02-07T12:17:26+5:30

शेवगाव नगरपरिषदेतील नगराध्यक्ष, नगरसेवक यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ रविवार ( दि.७ ) रोजी संपुष्टात आला आहे. यामुळे पुढील नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक होइपर्यंत प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Appointment of Administrator on Shevgaon Municipal Council | शेवगाव नगर परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती

शेवगाव नगर परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती

शेवगाव : शेवगाव नगरपरिषदेतील नगराध्यक्ष, नगरसेवक यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ रविवार ( दि.७ ) रोजी संपुष्टात आला आहे. यामुळे पुढील नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक होइपर्यंत प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

      निवडणूक पूर्व प्रशासकीय पातळीवरील तयारीला वेग आला आहे. प्रभाग रचना, आरक्षण जाहीर झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ८ मार्च रोजी मतदान केंद्र निहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यानंतर एप्रिल अथवा मे महिन्यामध्ये सार्वत्रिक निवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. नगराध्यक्ष निवडीपर्यंत प्रांताधिकारी देवदत्त केकाण हे प्रशासक म्हणून कारभार पाहणार आहेत.

 

Web Title: Appointment of Administrator on Shevgaon Municipal Council