राजकारणात काहीही होऊ शकते : डॉ.सुजय विखे यांच्याबाबत महाजन यांचे वक्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 20:21 IST2019-03-09T16:43:01+5:302019-03-09T20:21:05+5:30
अनेक राजकिय घराण्यांमधील लोक वेगवेगळ््या पक्षात असतात. आई एकापक्षामध्ये, दुस-या पक्षामध्ये वडील असतात तर तिस-या पक्षात मुलगा असतो.

राजकारणात काहीही होऊ शकते : डॉ.सुजय विखे यांच्याबाबत महाजन यांचे वक्तव्य
अहमदनगर : अनेक राजकिय घराण्यांमधील लोक वेगवेगळ््या पक्षात असतात. आई एकापक्षामध्ये, दुस-या पक्षामध्ये वडील असतात तर तिस-या पक्षात मुलगा असतो. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते असे सूचक विधान जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी नगरमध्ये पत्रकार परिषदेत केले.
जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांना Lokmat Ahmednagar येथे लाइव्ह पाहा
डॉ.सुजय विखे यांना भाजपकडून अहमदनगर लोकसभेची उमेदवारी देणार का ? असा प्रश्न विचारल्यानंतर महाजन यांनी राजकारणात काहीही होऊ शकते असे उत्तर दिले. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांची बैठक आज जलसंपदामंत्री महाजन यांनी घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
महाजन म्हणाले, सध्या लोकसभेच्या जागांबाबत आढावा घेण्यात येत आहे. विखे यांनी मागणी केल्यास त्यावर केंद्रीय समिती निर्णय घेईल. याबाबत निर्णय मी घेऊ शकत नाही. ज्यांची इच्छा आहे, अशा लोकांची नावे मी वरच्या पातळीवर कळवेल. विखे सध्या काँग्रेसमध्ये आहेत. आमच्याशी त्यांनी संपर्क साधलेला नाही. अहमदनगर लोकसभेच्या जागेसाठी भाजपाकडून अनेकजण इच्छुक आहेत, असेही महाजन म्हणाले.
जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांना Lokmat Ahmednagar येथे लाइव्ह पाहा