नगर शहरात आणखी एक पॉझिटिव्ह; सारसनगर भागातील व्यक्तीला लागण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:34 IST2020-05-13T12:33:44+5:302020-05-13T12:34:19+5:30

नगर शहरातील सारसनगर येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५५ झाला आहे. कालच शहरातील सुभेदार गल्लीतील ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर लगेच बुधवारी (दि.१३ मे) सारसनगरमध्ये रूग्ण सापडला. 

Another positive in the city; Infection of a person in Sarasnagar area | नगर शहरात आणखी एक पॉझिटिव्ह; सारसनगर भागातील व्यक्तीला लागण 

नगर शहरात आणखी एक पॉझिटिव्ह; सारसनगर भागातील व्यक्तीला लागण 

अहमदनगर :  नगर शहरातील सारसनगर येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५५ झाला आहे. कालच शहरातील सुभेदार गल्लीतील ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर लगेच बुधवारी (दि.१३ मे) सारसनगरमध्ये रूग्ण सापडला. 
सारसनगर येथील या व्यक्तीला दोन दिवसापूर्वी सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्याला सुरुवातीला खासगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. बुधवारी सकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. प्रशासनाने तात्काळ या भागात प्रतिबंधक उपाययोजना करणे सुरू केले आहे.

Web Title: Another positive in the city; Infection of a person in Sarasnagar area