श्रीरामपूर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळला; विलगीकरण कक्षातून सुटल्यानंतर बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 16:45 IST2020-06-24T16:44:51+5:302020-06-24T16:45:33+5:30

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वाडगाव येथील तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल बुधवारी (२४ जून) प्राप्त झाला.

Another patient was found in Shrirampur taluka; Obstruction after leaving the separation chamber | श्रीरामपूर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळला; विलगीकरण कक्षातून सुटल्यानंतर बाधा

श्रीरामपूर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळला; विलगीकरण कक्षातून सुटल्यानंतर बाधा

श्रीरामपूर : तालुक्यातील निपाणी वाडगाव येथील तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल बुधवारी (२४ जून) प्राप्त झाला.

 विशेष म्हणजे हा तरुण एप्रिल व मे महिन्यामध्ये पुणे व नाशिक येथे कामानिमित्त गेला होता. तो येथील ग्रामीण रुग्णालयात २२ जून रोजी सर्दी व किरकोळ आजाराच्या तपासणीकरिता तो आला होता. मात्र वैैद्यकीय अधीक्षक डॉ.वसंत जमधडे यांना संशय आल्याने त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी नगर येथील सिव्हील रुग्णालयात पाठविण्यात आले होते. 

बुधवारी दुपारी त्याचा वैैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. तालुक्यात आढळून आलेला हा सातवा रुग्ण आहे. दरम्यान, हा रुग्ण एप्रिल महिन्यामध्ये पुणे येथून गावात दाखल झाला होता. त्यानंतर १४ दिवसांकरिता त्याला विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले होते. एक महिन्यानंतर तो पॉझिटिव्ह आढळून आल्याचे डॉ. जमधडे यांनी सांगितले.  

Web Title: Another patient was found in Shrirampur taluka; Obstruction after leaving the separation chamber